ताज्या घडामोडी

अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव शहरातील अट्टल दुचाकी चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक करीत त्यांच्याकडून ४ दुचाकी जप्त केलेल्या आहे. प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबडे रा. सुप्रीम कॉलनी जळगाव, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सिद्धार्थ लुल्लया यांची दुचाकी २५ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनाच्या दिवशी मेहरुण तलाव परिसरातून चोरी झाली होती. एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करीत असतांना सुप्रीम कॉलनी परिसरमध्ये संशयित आरोपी हा चोरीच्या दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सुप्रीम कॉलनी मध्ये सापळा रचून संशयित आरोपी प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे याला अटक केली. त्याच्याकडील चोरीची दुचाकी जप्त केल्यानंतर त्याने चौकशीत अन्य चोरीच्या ४ दुचाकी काढून दिल्या.
पोलिसांनी ४ ही दुचाकी ताब्यात घेऊन संशयित आरोपीच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरी घरपोडी चोरी करणे असे पाच गुन्हे दाखल आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवा एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, विकास सातदिवे, छगन तायडे, आणि ललित नारखेडे, आदींच्या पथकाने कारवाई केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!