ताज्या घडामोडी

जिल्हापेठ पोलीसांची मोठी कामगिरी चोरीच्या ०७ दुचाकी हस्तगत

जिल्हापेठ पोलीसांची मोठी कामगिरी चोरीच्या ०७ दुचाकी हस्तगत

जळगाव जिल्हा गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडत असताना जिल्हातील सर्वच पोलीस स्थानकातील कर्मचारी या दुचाकीचा शोध घेत असतांना जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी तब्बल ७ दुचाकीसह एका आरोपीला अटक करण्यात आला आहे.
मोटारसायकल चोरीच्या ठिकाणी स्वतः भेट देवुन, आजुबाजुचे सि सि टी व्ही फुटेज चेक करणे, प्रत्येक मोटार सायकल चोरीच्या घटनास्थळाचा डम्पडेटा घेवून, त्यावर अभ्यास करणे, असे असतांना एकच नंबर वारंवार येत असल्याने, तसेच ब-याच ठिकाणी अंगकाठी सारखा असलेला इसम हा सि सि टी व्ही फुटेज मध्ये दिसुन येत असल्याने, आम्ही आमचे गुप्त बातमीदार पेरुन, सदर संशयीत इसमाचा शोध घेतला असता, सदरचा इसम हा रावेर तालुक्यातील वाघोदा येथील असल्याचे समजले. त्यानंतर वाघोदा गांवी विचारपुस करता, सदरचा इसम मागील ०१ वर्षापासुन गांवात राहत नसल्याचे समजुन आले.

त्यानंतर आम्ही डम्पडेटा मध्ये आलेला क्रमांकाचा सि डी आर काढता त्यामध्ये एक संशयीत नंबर दिसुन आला, त्या नंबरचा सि डी आर घेता सदरचा नंबर हा एका महीलेचा असल्याचे समजले. त्यावरुन आरोपी याचा चालु नंबर मिळवुन, त्या नंबरचा सि डी आर घेता सदरचा इसम हा काल जळगांव शहरात आल्याचे समजल्याने त्यास अजिंठा चौकातुन ताब्यात घेवुन, त्यास विचारपुस करता त्याने चोरलेल्या ०६ मोटार सायकली काहुन दिलेल्या आहेत. सदरचा आरोपी हा गुरन ६३२/२०२२ भादवी कलम ३७९ या गुन्हयात अटक आहे. तसेच आरोपी याने एम आय डी सी परीसरातुन चोरुन नेलेली मोटार सायकल क्रमांक एम पी १२ बी सी ३१८८ ही त्याने जळगांव शहर रेल्वे स्थानक परीसरात सोडुन दिल्याची कबुली दिल्याने सदरची मोसा जळगांव शहर पोलीस ठाणे येथे लावण्यात आलेली आहे.

राकेश पंडित भट (२४, रा. मोठे वाघोडा) असे आरोपीचे नाव आहे. रावेर ह. मु. अयोध्या नगर सिद्धेश्वर मंदिराच्या मागे, MIDC जळगाव
तसेच जिल्हापेठ पोलीस ठाणे गुरन ४१३/२०२३ भादवी कलम ३७९ या गुन्हयाचे तपासात गोपनिय माहीतीच्या आधारे सि सि टी व्ही मध्ये दिसत असलेला आरोपी नामे- विशाल मुरलीधर दाभाडे वय-२३ रा. रामेश्वर कॉलनी जळगांव हा मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आलेली असुन, त्याचेकडुन १५,०००/- रु. किं ची बजाज डिस्कव्हर कंपनीची मोसा क्र. एम एच १९ ए वाय ९९१७ हि जप्त करण्यात आलेली आहे.

एकुण मुददेमाल- १,८०,०००/- रुपये किंमतीच्या ०७ दुचाकी

पोलीस अधिक्षक, डॉ. एम राजकुमार, मा. अपर पोलीस अधिक्षक, अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावित, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकों. २५३४ सलीम तडवी, पोना. ३०८७ जुबेर तडवी, पोकॉ. ३२५७ अमितकुमार मराठे, पोकॉ. रविंद्र साबळे, पोकॉ. तुषार पाटील हे करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!