ताज्या घडामोडी

येवला शहर पाणी समस्या आणि पाणीप्रश्नी अनभिज्ञ असलेली येवलेकर जनता……* *डॉ.संकेत माणिकराव शिंदे.(मा.नगरसेवक येवला न.पा.)*

*येवला शहर पाणी समस्या आणि पाणीप्रश्नी अनभिज्ञ असलेली येवलेकर जनता……*
*डॉ.संकेत माणिकराव शिंदे.(मा.नगरसेवक येवला न.पा.)*
लिहण्यास कारण की,येवला शहरात ५दिवसाआड पाणी येत आहे . ही माझ्या प्रभागातील महिला पाणी येणार त्या दिवशी माझ्या घरी कमी पाणी आले किंवा आलेच नाही अशी तक्रार घेऊन येतात आपण valve man ला फोन करून जादा वेळ पाणी द्यावे म्हणून सांगतो पण ते पण काय करणार किती adjust करणार वाढते शहरीकरण,जुन्या १९ शतकातील सिमेंट पाइपलाइन एक ना अनेक समस्या…..खर तर जे मागील ६वर्षा पासून बघत आहे ते असे की ….
१) येवले शहराकरिता युती शासन (१९९६-२००१) मध्ये माझी आई नगराध्यक्ष असताना टप्पा क्र.२तलाव निर्मिती नंतर येवले शहर पाणी प्रश्न करिता कोणते ठळक काम झाले असेल तर कुणी सांगावे….
२) येवला शहर करिता २४तास पाणी पुरवठा करण्यासाठी २००८-०९ साली काम देण्यात आले…. बीलही अदा झाले पण कुठे आहेत मीटर आणि योजना….?
३) आम्ही २०१६-१७ मध्ये कॉलनी area मध्ये नवीन पाइपलाइन प्रस्तावित होत्या पण अनेक ठिकाणी कॉलनी area मध्ये पाइपलाइन नाहीत. जुन्या सिमेंट पाइपलाइन लिकेज आहेत त्या ही अनेक दिवस दुरुस्त होत नाहीत जबाबदार कोण ?
४) शहारकरिता शेठजी नी जुना तलाव जागा दिली आहे पण २०१६ पासून करारनामा संपला आहे तो आपण नूतनीकरण करू शकलो नाही.आज केवळ मार्च मध्ये वर्षातुन एकदा भरला तरी उन्हाळ्यात १ दिवसाआड पाणी देऊ शकतो.जागा किंवा पाणी कमी आहे असे नाही पण इच्छाशक्ती नाही….आपण केवळ विकासाच्या गप्पा मारू शकतो…..
५) २०१३ मध्ये येवला न.पा. ला स्वच्छ पाणी पुरठ्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता . साधारणत २०१७-१८ मध्ये वॉटर फिल्टर मधील वाळू लेयेर ( फिल्टर sand) बदलणे गरजचे होते पण न.पा. मध्ये केवळ चर्चा झाली पुढे काय? कुठून येणार स्वच्छ पाणी….
६) मागील ३-४ वर्षा पूर्वी कमी दाबाने पाणी येतं म्हणून आम्ही नव्याने वाढते शहरीकरण म्हणून ६नवीन जलकुंभ प्रस्तावित केले होते नवीन पाइपलाइनसह काय झाले पुढे?…. तलावातील पाणी गळती आणि बाष्पीभवन यावर ही मागील काळात काही उपाय सुचवले होते पण पुढे काहीच नाही…..
७) येवले शहराकरीता येसगाव (कोपरगाव) येथे न.पा. मालकीचा तलाव आहे पण आज न.पा. अधिकारी यांना असे काही न.पा. मालकीचे आहे हे सुध्दा सांगता येत नाही. एकतर फगणेकर साहेब२०१९-२० बदलून गेल्या नंतर मा. नगराध्यक्ष साहेबांनी अनेकवेळा पत्र देऊन सुध्दा पूर्णवेळ अधिकारी न.पा. मिळाला नाही ही तर शहराची शोकांतिका आहे…. तर येसगाव वरून पाणी कधी येणार? ….केवळ इलेक्शन ला आश्वासन मिळू शकते…..
८) आपण येवलेकर नागरिक रेगुलर पाणी पट्टी भरतो पण न.पा.ची आजही लाखो ची नासिक येथील पाणीपुरवठा थकबाकी आहे त्यामुळे पाणी रोटेशन मिळण्यास विलंब होतो हे कोण सांगणार?
९) आपल्या शेजारून पाटाने पाणी पुढे वैजापूर dam ला जाते आजही कधी गेले तिकडे तर बघा १२मही भरलेला असतो … शेजारील मनमाड मध्ये नव्याने शहाराकरिता पाइपलाइन काम सुरू आहे…..आणि आपण आजही १९ व्या शतकात आहोत…. नव्यानं पाणीप्रश्नी काम करण्याची गरज आहे कुणी एक व्यक्ती हे करू शकणार नाही ….हे आपल्यालाच करावे लागणार आहे …..बदल हा निसर्गाचा नियम आहे आपण जर बदललो नाही तर पाणी समस्या वाढत जाणार आहे आणि नागरिक (लोकप्रतिनिधी , अधिकारी) यांना शिव्या देणार ….आजही देत असणार पण आपण निगरगट्ट झालो आहोत….राहुल लोणारी यांनी मागील आठवड्यात काही उपाय सुचवले पण सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची तळमळ योग्य पण न.पा. दखल घेणार का?….
आम्ही सर्वपक्षीय काही नगरसेवकांनी वेळोवेळी ठराव केले, मासिक सभेवेळी महिला नगरसेवकसह प्रश्न मांडले पण प्रशासकीय आणि राजकीय इचछाशक्तीचा अभाव राहिला…..
शहरातील नागिकांना माहिती असावी म्हणून वरील गोष्टी सांगितल्या कोणतीही राजकीय भूमिका नाही केवळ आपण ह्या पाणी समस्येला पुढील काळात कसे तोंड देणार …..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!