ताज्या घडामोडी

सटाणा तहसील कार्यालयासमोर शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांचे व्यंगचित्रांच्या माध्यमातून अनोखे आंदोलन.

*सटाणा तहसील कार्यालयासमोर शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांचे व्यंगचित्रांच्या माध्यमातून अनोखे आंदोलन.*
पोलीस टाईम्स न्युज : सुनिलआण्णा सोनवणे

*चांदवड* : नाशिक जिल्ह्यातील खूपच कमी झालेल्या कांद्याच्या किमती संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत रस्ता रोको, उपोषण अशा पद्धतीचे अनेक मार्ग अवलंबले परंतु सरकारला याबद्दल कोणत्याही प्रकारे जाग न आल्याने शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी आज व्यंगचित्रातून प्रदर्शन भरवुन अनोख्या पद्धतीचे आंदोलन सटाणा तहसील कार्यालय समोर केले.

या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. मागील दोन वर्ष कोरोना काळ व उष्माघात तर यावर्षी अतिवृष्टी व अवकाळी पाऊस गारपीट या कारणांनी शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना शेतातील पिकांचा भावच मिळत नसल्याने अगोदरच कर्जाच्या खाईत लोटलेला शेतकरी परत कर्जबाजारी होत चालला असून अस्मानी संकटातून राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांप्रती असलेला आपला आदरभाव शेतकऱ्यांच्या मालाला किंमत देऊन जर व्यक्त केला तर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आनंदी होऊन सुखी झाल्यासारखे वाटेल.

नाफेडची कांदा खरेदी ही सुद्धा एक धूळफेक असून शेतकऱ्यांना वाचवण्याचे काम या केंद्र व राज्य सरकारने करावे सध्या शंभर ते दीडशे रुपये क्विंटल ने कांद्याची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे शेतकऱ्यांचा कांद्याचा खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होईलच यात तीळ मात्र शंका नसून त्याच्या बोजाखाली शेतकरी निश्चितच दबला जाईल त्यामुळे कांदा पिकाला योग्य बाजारभाव हीच शेतकऱ्यांची मागणी आहे आपल्या या व्यंगचित्रांमधून शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे जर यांनी राज्य व केंद्र सरकारला जाग येण्यासाठी आपल्या व्यंगचित्रांमधून साकारलेली चित्रे याप्रसंगी ठेवण्यात आली होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!