क्राईम

चाळीसगावातील ११ गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई

चाळीसगावातील ११ गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई

       प्रतिनिधी शाहिद खान           

चाळीसगाव: जळगावातील बावरी गॅंगवर मोक्काची कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगाव शहरासह तालुक्यातील गुन्हेगारी टोळीतील तब्बल ११ जणांविरोधात मोकाची कारवाई करण्यात आल्याने जिल्हातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अमोल उगन गायकवाड (वय-२५) रा. स्वामी समर्थ कॉलनी नागद रोड चाळीसगाव, टोळी सदस्य सुमित उर्फ बाबा अशोकराव भोसले रा. नागद रोड चाळीसगाव, (अटकपूर्व जामीनावर) कृष्णा उगन गायकवाड रा. नागाद रोड चाळीसगाव, संतोष उर्फ संता पैलवान रमेश निकुम रा. हिरापूर ता. चाळीसगाव, विकी उर्फ शुभम विजय पावले, ( वय-२३) रा. हिरापूर ता. चाळीसगाव, श्याम उर्फ सेम नामदेव चव्हाण, (वय-२४) रा. हिरापूर ता. चाळीसगाव, सचिन सोमनाथ गायकवाड (वय- २२) रा. बाबाजी चौक चाळीसगाव, जयेश दत्तात्रय शिंदे पाटील ( वर-२४) रा. भोरस खुर्द ता. चाळीसगाव, उद्देश उर्फ गुड्डू सुधीर शिंदे (वय-२४) रा. हिरापुर ता. चाळीसगाव, योगेश रतन पांचाळ पडवळकर ( वय-२६) रा. हिरापूर ता. चाळीसगाव, पुष्पाराज उर्फ सुनील जगताप रा. पिंपळखेळ ता. चाळीसगाव,(फरार) यांच्यावर करण्यात आली.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना मार्गदर्शन करून टोळीवर दाखल गुन्हा कायद्याचे कलम वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांनी मोक्का प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या कार्यालयात २२ जानेवारी रोजी सादर केला.
त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून २१ जानेवारी रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्याकडे प्रस्तावाचे अवलोकन करून वरील आरोपीतांनी टोळीने केलेल्या गुन्हे अभिलेख तपासणी करून सदर गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे क. ३ (१) (खख), ३ (२) ३(४) (मोक्का) हे कलम लावण्याची परवानगी २५ जनवरी रोजी दिल्याने चाळीसगाव शहर पो.स्टे. वरील गुन्ह्यांतील वरील आरोपीतांनवर मोक्का कायदाखाली कलम लावण्यात आला आहे. या कामी निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार युनुस शेख इब्राहिम, सुनील पंडित, दामोदर तसेच चाळीसगाव शहरचे निरीक्षक कांतीलाल पाटील, सहा पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी योगदान दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!