ताज्या घडामोडी

तांबापुरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक

तांबापुरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील दुकानदाराच्या घरातून पन्नास हजाराची रोकड चोरी झाल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक माहिती अशी की,
१ फेब्रुवारीच्या रात्री सादिन पटेल हे खालच्या मजल्यावरील घराला कुलूप लावून वरच्या मजल्यावर परिवारासह झोपण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता घराच्या कडीकोंडा तुटलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. घरातील वस्तूंची पाहणी केली असता किचनमधील डब्यासह पर्समधील एकूण पन्नास हजाराची रक्कम चोरी झाल्याचे आढळून आले. या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहेदिनांक 01/02/2023 रोजी रात्री 11:00 ते सादिन शब्बीर पटेल, वय 40 वर्ष, व्यवसाय दुकान, रा. शहिद अब्दुल हमीद चौक, तांबापुरा, जळगाव हे त्यांचे परीवारासह जेवण करुन वरच्या मजल्यावर झोपलेले होते. दिनांक 02/02/2023 रोजी सकाळी 06:00 वा. त्यांना जाग आली असता त्यांना त्यांचे घराचे कडी कोंडा तुटुन दरवाजा उघडा असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी घरातील सामान पाहीला असता त्यांचे घरात किचन मध्ये असलेल्या गल्यातील 35,000/- रु रोख तसेच लेडीज पर्स मधील 15,000/- रु रोख असे एकुण 50,000/– रु चोरी झाले होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना मा. पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे सो. यांना गुप्त बातमी केली कि, सदरची चोरी हि रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे इश्तीयाक अली राजीक अली याने केली आहे. सदर बातमी वरुन गुन्हे शोध पथकाचे स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील अशांनी सदर आरोपी नामे इश्तीयाक अली राजीक अली, वय 20 वर्ष, रा. शाहुवालीया मशीद जवळ, तांबापुरा, जळगाव यास तांबापुरा भागातुन अटक केली आहे. इश्तीयाक अली राजीक अली हा एम.आय.डी.सी. पो.स्टे. चा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी 06 घरफोडी तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहे.

सदर अटक आरोपीतास आज दिनांक 04/03/2023 रोजी मा. न्यायाधिश श्रीमती जे. एस. केळकर मॅडम यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने अटक आरोपीतांची दिनांक /02/2023 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अङ स्वाती निकम मॅडम यांनी काम पाहीले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!