ताज्या घडामोडी
गावठी पिस्टलाच्या धाकवर दहशत; शिरपुरातील संशयित गुन्हे शाखेचे जाळ्यात
गावठी पिस्टलाच्या धाकवर
दहशत; शिरपुरातील संशयित गुन्हे शाखेचे जाळ्यात
प्रतिनिधी शाहिद खान
(धुळे: गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करणाऱ्या शिरपूरातील संशयीताला धुळे गुन्हे शाखेने सोनगिरी गावजवळील वालखेडा फाट्याजवळ अटक केली आहे.
संशयित हरीओम संजय सिंग, (रा. करवंद नाका शरदचंद्र नगर शिरपूर) याचे कडे गावठी कट्टा असून त्या आधारे तो दहशत निर्माण करीत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर सोनगिरी गावाजवळीत वालखेडा फाट्यावर शुक्रवार २५ नोव्हेंबर रोजी हरिओम संजय सिंह याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या तब्येतून एक गावठी कट्टा व २५. हजार रुपयांच्या गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीच्या एक काडतुस जप्त करण्यात आले.