ताज्या घडामोडीदेश विदेश

येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने भव्य संविधान गौरव रॅली मोठ्या उत्साहात साजरी*

*येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने भव्य संविधान गौरव रॅली मोठ्या उत्साहात साजरी*

*विविध जाती धर्माचे धर्मगुरू व विद्यार्थ्यांनी रॅलीचे लक्ष वेधले*

आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सालाबादाप्रमाणे संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी 10 वाजता येवला विंचूर चौफुलीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नायब तहसीलदार सौ निरंजना पराते मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली या रॅली सुरुवात झाली यावेळी आलेल्या विविध आलेल्या धर्मगुरूचे स्वागत करण्यात आले ही रॅली शहरातील मुख्य बाजारपेठेतून टिळक मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ गेली ढोलीबाजा व घोषणांनी संपूर्ण येवला शहर दणाणून गेले होते यावेळी सौ.आशा आहेर यांनी संविधानाच्या प्रास्तावितेचे वाचन केले याप्रसंगी भुजबळांचे सिवसहाय्यक बाळासाहेब लोखंडे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे काँग्रेसचे समीर देशमुख सेनेचे शहराध्यक्ष राजाभाऊ लोणारी नगरसेवक अमजद शेख पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब यांचे भाषण झाली यावेळी महेंद्र पगारे हे भाषणात म्हणाले की संविधान या देशाचा मुख्य गाभा आहे देशाला दिलेला पवित्रा सविधान आहे जे अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकसंघ ठेऊन जगात भारत देशाची लोकशाही या नावाने ओळखले जाते मला माझ्या येवला शहराचा गर्व आहे की आजच्या संविधान गौरव रॅलीत सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील सर्व धर्माचे धर्मगुरू सामाजिक राजकीय शैक्षणिक अधिकारी व समाज बांधव हे सर्व मतभेद विसरून संविधानाचा आदर करत एकत्र जमतात व महापुरुषांच्या विचाराला गती देण्याचं काम करतात येवला शहराचा आदर्श इतरही शहरातील जनतेने घ्यावा अशी आव्हान देखील त्यांनी यावेळी बोलताना केले जर खरोखर संविधानाचे अंमलबजावणी झाली तर देशात शांतता नांदेल व देश प्रगती कडे गेल्याशिवाय राहणार नाही तसेच जे जे लोक जातीचा आधार घेतात त्या स्वार्थी लोकांना लोकांनी दळणातील खड्याप्रमाणे लांब फेकून दिले पाहिजे व सर्वच महापुरुषांचा आदर केला पाहिजे असे आव्हानही यावेळी महेंद्र पगारे यांनी बोलताना केले यावेळी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली
या ठिकाणी संविधान जिंदाबाद डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेला होता

यावेळी बौद्ध भत्ते करुणानंद ब्रह्मकुमारी नीता दीदी ख्रिश्चन धर्माचे पीटर काळे मोरे गुरुजी मौलाना नायब तहसीलदार सौ. निरंजना पराते मॅडम पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब एपीआय नितीन खडांगळे बाळासाहेब लोखंडे आनंद शिंदे समीर देशमुख राजे अमजद शेख राजाभाऊ लोणारी सुभाष गागुर्डे विजय घोडेराव बाळासाहेब अहिरे मयूर सोनवणे सुरेश खळे अशोक पगारे विनोद त्रिभवन विजय पगारे डॉ.केदारे संजय निकम अॅड.अनिल झाल्टे राम कोळगे बाळासाहेब गायकवाड साहेबराव झाल्टे गणेश झाल्टे मनोज हिवाळे महिला आघाडीच्या सौ.आशा आहेर अॅड. स्मिता झाल्टे सरिता शिरूर ज्योती पगारे उषा पगारे सविता अहिरे यांच्यासह अनेक महिला व पुरुष तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!