राजकीय

सरपंच अथवा सदस्य यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत

 

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग,

बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, मुंबई – ४०० ००१.

दूरध्वनी क्र. ०२२-२२८३९९२४

ई मेल: sopr2.rd-mh@nic.in

क्रमांक : संकिर्ण २०२२/प्र.क्र. १७० / परा-२

प्रति,

दिनांक २५ नोव्हेंबर २०२२

जिल्हाधिकारी, सर्व

विषय:- सरपंच अथवा सदस्य यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत

संदर्भ:- १. सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५४, दिनांक १३ ऑगष्ट, २०१८ २. सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २. दिनांक ५ मार्च, २०२० ३. सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४२, दिनांक २९ ऑगष्ट २०२२

महोदय,

४. मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील रिट याचिका क्र. २०२/२०१८ यामधील दिनांक ६ मार्च, २०१८ रोजीचे आदेश

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १३ मधील शैक्षणिक अर्हतेबाबत स्पष्टीकरण मिळण्यासाठी विविध जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून विचारणा करण्यात येत होती.

त्याअनुषंगाने नमुद करण्यात येते की, सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२, दिनांक ५ मार्च, २०२० अन्वये कलम १३ मधील पोट कलम २ (अ) मधील “सरपंच” या शब्दाऐवजी “सदस्य” हा शब्द दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजेच या सुधारणान्वये ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी दिनांक १ जानेवारी, १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तीस इयत्ता ७ वी परीक्षेची उतीर्ण किंवा त्यासमदा शैक्षणिक अर्हता लागु करण्यात आली. तसेच सदर सुधारणेत सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४२, दिनांक २९ ऑगष्ट, २०२२ रोजीच्या सुधारणेनुसार कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

तसेच मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. २०९/२०१८ व इतर याचिका यांमधील

दिनांक ६ मार्च, २०१८ रोजीच्या आदेशान्वये जनतेतून निवडून आलेला थेट सरपंच हा ग्रामपंचायतींचा

पदसिध्द सदस्य असतो असा आदेश दिलेला आहे.

Scanned with CamScanner

तथापि उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता, “ जी व्यक्ती दिनांक १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असेल त्याव्यक्तीस सरपंच अथवा सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता किंवा पोट निवडणूकीकरीता नामनिर्देशन करण्याकरीता किमान शालेय शिक्षणातील ७वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा तिने सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे ७वी इयत्तेशी समतुल्य शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.”

आपला विश्वासु

2511112022

(सुनिल माळी) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :- कक्ष अधिकारी, कार्यासन ८, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई.

=

O

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!