ताज्या घडामोडी

सुप्रीम कॉलनीत तलवारींच्या बळावर दहशत माजवणा-यास अटक

सुप्रीम कॉलनीत तलवारींच्या बळावर दहशत माजवणा-यास अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत रामदेव बाबा मंदिराजवळ तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी रामदेव बाबा मंदिरजवळ एका तरुण बेकायदेशीर हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, पो.हे.कॉ महेंद्रसिंग पाटील, पो. नाईक किरण धनगर, यांच्यासह पोलिसांनी दुपारी २ वाजता कारवाई करत संशयित आरोपी समीर समशेर तडवी (वय- २०) रा. सुप्रीम कॉलनी जळगाव याला अटक केली आहे. त्यांच्याजवळ असलेली ४ हजार रुपये किमतीच्या २८ उंच लांबीची तलवार हस्तगत केली आहे. पो. नाईक किरण धनगर यांची फिर्यादीवरून संशयित आरोपी समीर समशेर तडवी, याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!