ताज्या घडामोडी

पिंप्राळा हुडको परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडले.

पिंप्राळा हुडको परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडले.

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील पिंपराळा ( हुडको) परिसरातील एका बंद घर फोडून सोन्याचे दागिन्यांसह गॅस सिलेंडर व इतर सामान चोरून नेल्याचे समोर आले आहे. दहा दिवसानंतर मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, आशा रतनलाल जैन ( वय-६०) रा. पिंप्राळा हुडको जळगाव या महिला आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ९:०० वाजता दरम्यान त्यांचे घर बंद होते. याच्या फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने गॅस सिलेंडर वर स्टीलची शेगडी, असा एकूण २१ हजार ५०० रुपये किमतीच्या मुद्देमाल चोरून याचे समोर आले. या संदर्भात १० दिवसानंतर मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हे.कॉ संजय सपकाळे करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!