महेंद्र पगारे यांची राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार -2022 कोल्हापूर येथे पुरस्कारासाठी निवड*
*महेंद्र पगारे यांची राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार -2022 कोल्हापूर येथे पुरस्कारासाठी निवड*
येवला तालुक्यातील आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्ते व अनकुटे सावखेडे सोसायटीचे चेअरमन महेंद्रभाऊ पगारे यांनी सर्व जाती धर्माना बरोबर घेऊन नेहमी मोर्चा आंदोलन तसेच सामाजिक क्षेत्रातील उपक्रम राबवित आहे त्यामुळे त्यांच्या कामांची दखल नेहमीच येवल्यातील पत्रकार घेत असतात त्यामुळे एका छोट्याशा गावातून आलेल्या तरुणाला आज कोल्हापुरात सर्वात नावाजलेला सत्यशोधक पुरस्कार -2022साठी निवड होणे म्हणजे खुप अभिमानाची गोष्ट आहे कारण 800हुन अधिक प्रस्ताव आले असताना देखील निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांनी महेंद्र पगारे यांची निवड जाहीर करून त्यांना निमंत्रण पत्र पाठवले आहे हा पुरस्कार 28नोव्हेंबर 2022रोजी दुपारी 4वाजता राजश्री शाहू स्मारक भवन,मुख्य सभागृह.कोल्हापूर येथे साहित्यिक,विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष मा.डाॅ. श्रीपाल स्वीस,प्राचार्य डाॅ.राजेखान शानेदिवाण,मा.खासदार धैर्यशील माने यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्यासाठी पगारे हे कोल्हापुरात जाऊन शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा पुरस्कार स्वीकारणार आहे