ताज्या घडामोडी

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (दि. १६) माध्यमांशी बोलताना जोरदार टोलेबाजी केली.

मी सीनियर आमदार असूनही मला मुख्यमंत्री भेटत नाहीत!

भुजबळ यांची टोलेबाजी : कांदे यांना विश्वासात घेण्याचा सल्ला

नाशिक: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री

आमदार आहे.

 मंत्रालयात भेटतच नाही. मी सीनियर म्हणजे १९९१ पासून मलाही भेटत नाही काय करावे कळत नाही असे सांगतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (दि. १६) माध्यमांशी बोलताना जोरदार टोलेबाजी केली.

मुख्यमंत्री भेटत नाही असे सांगताना त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविषयी हीच ओरड होती, याचे मिश्कीलपणे स्मरणही करून दिले. भुजबळ फार्मवर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी

राज्यात मध्यावधी निवडणुका लगेच लागतील असे वाटत नाही, मात्र कधीही निवडणुका झाल्या तर राजकीय पक्ष तयार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा गुजरातमध्ये नक्की फायदा होईल असे सांगून भुजबळ यांनी सांगितले की त्यांना पप्पू म्हणून हिणवण्यात आले, मात्र त्यांच्या पदव्या खच्या आहेत.

मंत्रालयात भेटले पाहिजे, आमदार आणि विरोधी पक्षनेते अशा सर्वांसाठी दिवस राखीव ठेवून भेटले पाहिजे, हीच पद्धत असते. मात्र, आता असे होताना दिसत नाही. मी सीनियर आमदार पण मलाही भेटत नाही, कधी तरी मॅसेजचे उत्तर येते असे सांगितले.

दरम्यान, सध्या आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्यात विश्वासात घेण्यावरून उलट सुलट चर्चा आहे. भुजबळ हे पालकमंत्री असतानादेखील कांदे यांनी त्यांच्याशी संघर्ष केला होता. त्यामुळे सध्याच्या वादावर बोलताना भुजबळ मिश्कीलपणे कांदे हे अत्यंत निष्ठावान

आणि कार्यसम्राट आहेत. त्यांना भुसे यांनी विश्वासात घेतले पाहिजे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल गुन्ह्यावरूनही भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली. अशाप्रकारचा गुन्हा दाखल करून सरकारची प्रतिष्ठा वाढली काय असा प्रश्न त्यांनी केला माझ्यावरही मागे अशाच प्रकारे फोनवरून धमकी दिल्याचे आरोप झाले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समजदार आहेत. त्यांनी लक्ष घालायला हवे होते. हे प्रकरण सरकारवरच उलटल्याचे ते म्हणाले. नाशिकमधील सिडको कार्यालयाचे स्थलांतर करण्यासही भुजबळ यांनी विरोध दर्शवला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!