क्राईम

सराफ बाजारातील ज्वेलरीचे दुकान फोडणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार २४ तासांचे आंत स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद

प्रतिनिधी शाहिद खान

सराफ बाजारातील ज्वेलरीचे दुकान फोडणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार २४ तासांचे आंत स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद

जळगाव शहरात सराफ बाजारातील ज्वेलरी शॉप फोडणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अवघ्या २४ तासांच्या आंत जेरबंद केले आहे. पुढील तपास कामी त्याला शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे असे अटक करण्यात आलेले अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, सराफ बाजारातील मनीष ज्वेलर्स या दुकानातून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एवज चोरी झाला होता. या घटना प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे (वय-२७ रा. पावर हाऊसनजीक भिलवाडी- जळगाव) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची गोपनीय माहिती एलसीबी चे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अमोल देवळे, पोलीस अंमलदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, अश्रफ शेख, रवी नरवाडे, संतोष मायकल, महेश महाजन, सुरज पाटील, अविनाश देवरे, जयंत चौधरी, संदीप सावळे, उमेश गोसावी, राहुल बैसाणे, आदींच्या पथकाने शोध घेत विशाल सोनवणे यास ताब्यात घेतले.पो.नि किसनराव नजन पाटील यांच्यासमक्ष हजर करण्यात आले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!