क्राईम

खुनाच्या गुन्हातील फरार महिलेस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

खुनाच्या गुन्हातील फरार महिलेस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील शिरसोली नाक्याजवळ फटाके फोडण्याच्या वादातून झालेल्या खुनाच्या घटनेतील फरार संशयित महिलेस एमआयडीसी पोलीस यांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे!
सत्कौर सिंग बावरी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. संजय सिंग टाकिया तरुणाची हत्याप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी पहाटे एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा झालेल्या पासून फरार संशयित महिला आरोपी सतकौर जगदीशसिंग बावरी ही मनमाड येथे लपून असल्याच्या माहितीवरून गुन्हे शोध पथकातील .सह.फौ आनंद सिंग पाटील,पो.ना विकास सातदिवे, व महीला पो.कॉ सपना ऐरगुंटला आदींनी पथकाने मनमाड गाठत स्थानिक पोलिसांचे मदतीने महिला आरोपी अटक केली आहे!
मनमाड शहरातील मोठे गुरुद्वार भागात ही लपली होती. पोलीस पथक आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच तिने पळून जाण्याचे प्रयत्न केला. मात्र पथकाने पाठलाग करत तिला ताब्यात घेत अटक केली. अटकेतील मोहनसिंग बावरी, मोनू सिंग जगदीश बावरी, जगदीश हरीसिंग बावरी, व सतकौर जगदीश सिंग बावरी, या सर्वांना न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहा.फौ. आनंदसिंग पाटील, पोना विकास सातदिवे, व पो.कॉ सपना एरगुंटला, तसेच मनमाड शहर पोस्टचे पो.कॉ सागर महाले आदींनी या तपास कामी सहभाग घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!