ताज्या घडामोडी

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सिंदखेड राजाचे शहरात दसऱ्याला ओपनिंग आणि संक्रांतीला कार्यक्रम आवरला शेकडो गुंतवणूकदार हवालदिल*

*!!! मी शेवगावकर चा दणका मोडला अलीबाबा आणि चाळीस चोरांचा मणका !!!*

*मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सिंदखेड राजाचे शहरात दसऱ्याला ओपनिंग आणि संक्रांतीला कार्यक्रम आवरला शेकडो गुंतवणूकदार हवालदिल*

{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील गेल्या वर्षी 19 ऑक्टोबर मध्ये स्थापन झालेल्या मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह लिमिटेड संस्थेचा गाशा अवघ्या तीन महिन्यात गुंडाळला गेला गुंतवणूकदार मेंढराप्रमाणे एका मागोमाग खड्ड्यात पडत गेले आपल्याला दिलेल्या मुदत ठेव पावतीवर संबंधितांच्या सह्या आहेत का व्याजाचा दर काय लिहिलेला आहे याची शहानिशा आणि खात्री सुद्धा काही लोकांनी केली नाही संस्थेचा मुख्य प्रवर्तक नेमका कुठला तो यापूर्वी व्यवसायात यशस्वी झालेला आहे की नाही का तो तिकडचे कर्ज फेडण्यासाठी इकडे मोठा डोंगर करत आहे ??? याची सुद्धा कोणी खात्री केली नाही त्यामुळे गुंतवणूकदारांची अवस्था “लाभ णा नफा येऊ द्या गपागपा” अशी झाली आता मी माझी प्रॉपर्टी विकतो वावर विकतो मग दमा दमा ने तुमचे पैसे परत देतो पुढल्या बुधवारी काम होईल शुक्रवारी नक्की काम होईल आता वीकेंड आहे सोमवारी नक्की खरेदी होईल अशा बातम्या 15 जानेवारी 2024 ते आज 02 मे 2024 पर्यंत गुंतवणूकदारांना संबंधित संस्थेचे तथाकथित पदाधिकारी आणि त्यांचे चेले चपाटे संचालक व जास्त “रहमान कीडा असलेले” लीडर नामक 40 चोर या लोकांनी जशी ये संचालक मंडळाची सुपारीच घेतली होती { त्यांनी पैसे नाही दिले तुम्ही तुमचे पैसे परत करीन } अशा पद्धतीने कारभार करून सर्वसामान्य शिक्षक व्यापारी प्लॉटिंग क्षेत्रातील मान्यवर इस्टेट एजंट शेतकरी शेतमजूर महिला यांना भुरळ पाडून कोट्यावधी रूपायांना गुंतवणूक करायला भाग पाडले काही नमुने तर एक लाख रुपयाची मुदत ठेवा ना दोन हजार ते पंधरा हजार रुपये कमिशन देतो यावर काहींनी काम केले आता “सगळ्यांचे टांगा पलटी घोडे फरार झाल्यानंतर” आपण काय काशी केली याची जाणीव या लीडर लोकांना झाली आहे भाऊ तुमच्या पाया पडतो पण माझं नाव तुम्ही केलेल्या बातमीत घेऊ नका अशी गयावया करताना लीडर लोक दिसत आहेत आणि गुंतवणूकदार त्यांची *अंधारात चांगली बिन पाण्याने हजामत करत आहेत* त्यांचं दुःख म्हणजे “सहननही होईना आणि सांगता येईना” दुःख याची नाही की फसवणूक झाली म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो दर सहा महिन्याला काही भामटे नवीन फसव्या योजना आणून लोकांना गंडा घालणार जोपर्यंत अशा भामट्यांनात मरेपर्यंत फाशीची शिक्षा अशी तरतूद जोपर्यंत कायद्यात होत नाही तोपर्यंत हे “बाराचे भामटे” भाबड्या लोकांचा गैरफायदा घेताना दिसत राहतील

*ताजा कलम*

या संस्थेत कोट्यावधी रुपयांची मूळ गुंतवणूक केलेली मुद्दल आणि त्याचे आजपर्यंत होणाऱ्या व्याजासह रखमा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत “मी शेवगावकर चा” लढा असाच अखंड सुरू राहील हे “व्हाईट कॉलर गुन्हेगार” समाजात खोट्या प्रतिष्ठेचा बडेजावं करून “लोकांच्या मढयाच्या टाळूवरील लोनी खाण्याचा” प्रकार बंद करत नाही तोपर्यंत यांची वरात काढणार मग ते शेअर मार्केट वाले असो बिटकॉइन वाले असो व बनावट मूदत ठेव पावत्या F.D.R. वाटून फसवणूक करणारे असो एम. एल. एम. नावाची { चेन सिस्टीम } असो यांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टाकल्याशिवाय राहणार नाही

*{ क्रमशः }*

*या आली बाबा चाळीस चोरांचे E.O.W. व M.P.D.A. कायदा 2019 अंतर्गत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असलेले { सर्व खाजगी बँका सरकारी बँका सहकारी पतसंस्था व डी-मॅट मधील खाते गोठविले } की यांना भारतात मंदिराबाहेर भिक सुद्धा मागता येणार नाही???*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!