ताज्या घडामोडी

परळीच्या परचुंडी, मलनाथपूर परिसरात जमिनीतुन गूढ आवाज, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन……



परळीच्या परचुंडी, मलनाथपूर परिसरात जमिनीतुन गूढ आवाज,
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन……

सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी

परळी तालुक्यातील परचुंडी मलनाथपुर परिसरात अचानक काही क्षण जमिनीतुन गुढ आवाज व जमीन हादरल्याचा अनुभव नागरिकांना आला. त्यामुळे नागरिकांत भिती निर्माण झाली आहे.
दरम्यान याबाबत महसूल प्रशासन सखोल माहिती घेत आहे.
हे हादरे परचुंडी मलनाथपुर परिसराला दिनांक २५ रोजी पासून जाणवत आहेत.
जमीन हादरली व जमिनीतुन आवाज आल्यामुळे पत्रे वाजल्याचे जाणवल्यचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

अचानक जाणवलेल्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोठा हादरा बसला व जमिनीतुन गुढ आवाज परिसरातील लोकांना ऐकायला आला.
त्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र झाले होते. नेमका हादरा कशामुळे बसला हे स्पष्ट झाले नाही.
दरम्यान नागरिकांनी अधिकृत व खात्री करूनच माहिती पुढे प्रसारित करावी.
अफवा पसरवू नये किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!