ताज्या घडामोडी

आकाशातून उल्कापिंड पडल्याने घराच्या छताला तडे, नागरिकांत भितीचे वातावरण…..

आकाशातून उल्कापिंड पडल्याने घराच्या छताला तडे,
नागरिकांत भितीचे वातावरण…..

सुबोध सावंत -नवी मुबंई प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील पिलीभीत शहरात आकाशातून दगड पडल्यामुळे अनेक लोकं घाबरले. या दगडाची संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे.
आकाशातून पडलेल्या हा दगड गरम असल्यामुळे त्याला स्पर्श केल्यावर हाताला चटका लागत होता,
असेही अनेकांनी या दगडाविषयी सांगितले.

ही घटना पिलीभीत शहरातील इनायतगंज येथे घडली.
दुपारी एकच्या सुमारास रघुवर सिंग यांच्या घराजवळ राहणारे सुनील गुप्ता यांच्या घरावर आकाशातून दगड पडल्याने मोठा आवाज आला.
त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
आकाशातून पडलेल्या या दगडाचा आवाज इतका जोरदार होता की,
परिसरातील लोकांना स्फोट झाला आहे, असे वाटले.
आकाशातून पडलेला हा दगड सात तासांनंतरही तापलेला होता.
छतावर पडल्यामुळे भिंतीला तडा गेला आणि लोखंडी पत्राही तुटला.
हा दगड म्हणजे उल्कापिंड असल्याचा दावा या गावातील लोकांनी केला आहे.

दुर्मिळ उल्कापिंड आकाशात दिसणार्‍या वस्तू, कधीकधी वेगाने फिरतात किंवा पृथ्वीवर पडतात. वायूमंडलातील ज्वलनातून जो अंश पृथ्वीवर पडतो त्याला उल्कापिंड म्हणतात.
दररोज अगणित उल्का दिसू शकतात,
मात्र पृथ्वीवर पडणाऱ्या उल्कांची संख्या फारच कमी आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व खूप जास्त आहे,
कारण त्या अत्यंत दुर्मिळ आहेत तसेच आकाशात फिरणारे इतर अनेक ग्रहांच्या त्या एकमेव स्त्रोत आहेत.

या घटनेबाबत ज्यांच्या घरावर हे उल्का पिंड पडले होते,
त्या घराचे मालक सुनील गुप्ता यांनी सांगितले की,
रात्री ते आणि त्यांची पत्नी झोपले होते,
त्यावेळी १ वाजण्याच्या सुमारास घराच्या अंगणात मोठा दगड पडला.
आम्ही घाबरून गेलो.
दगडाला स्पर्श केला तेव्हा तो जळत होता.
जड दगड असल्याने तो उचलताही आला नाही.
त्यानंतर स्थानिकांना सांगितले. ही घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!