ताज्या घडामोडी

वसई तालुक्यातील चिंचोटी येथे जिजाऊ संस्थेमार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित

सुहास पांचाळ / पालघर जिल्हा प्रतिनिधी*

*वसई तालुक्यातील चिंचोटी येथे जिजाऊ संस्थेमार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित*

*सुहास पांचाळ / पालघर जिल्हा प्रतिनिधी*

वसई / चिंचोटी : दि.१३ : वसई तालुक्यातील चिंचोटी येथे आज दिनांक १३.१०.२२ रोजी जिजाऊ संस्थेमार्फत मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

संस्थेचे ध्येय असे की, एकही रुग्ण आरोग्य सुविधेपासून वंचित न राहता तो दगाऊ नये. त्याप्रमाणे त्यांनी आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी आयोजित केले होते. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेतला. शिबिरात एकूण २७७ नागरिकांनी सहभाग घेतला. त्यापैकी जनरल तपासणी १४४ तर नेत्र तपासणी १३३ करण्यात आल्या तसेच ८० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
ज्या रुग्णांना मोतीबिंदू झाला आहे अशा रुग्णांचे ऑपरेशनमध्ये श्री.भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल, झाडपोली येथे मोफत करण्यात येतील. असे सांगण्यात आले.

यावेळी माधुरी महाजन सिस्टर , अंगनवाडी सेविका सुलभा धाग, आशा वर्कर, नमिता चव्हाण, सुचिता गवळी, दुर्गा चव्हाण, पुष्पा भुरकुड मदतनीस यांनी मोलाचं सहकार्य केले.
तसेच जिजाऊ संस्था तालुका प्रमुख हर्षाली खानविलकर व स्वयंसेविका अर्चना पाटील उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!