ताज्या घडामोडी

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनची वार्षिक सभा संपन्न- जळगाव जिल्ह्याचे कौतुक

प्रतिनिधी शाहिद खान

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थातच महाराष्ट्र राज्य फुटबॉल बॉडी ची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील कुपरेज फुटबॉल ग्राउंड येथे दि १२ ऑक्टोबर बुधवारी दुपारी ३ वाजता सुरू होऊन ५ वाजता संपन्न झाली यात वेगवेगळे सात ठराव पारित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष हरेश व्होरा, उपाध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे ,माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम , मालोजीराजे छत्रपती सचिव साउटर वाज़, खजिनदार प्यारेलाल चौधरी, सहसचिव सलीम परकोट,किरण चौगुले आदींची उपस्थिती होती.
जळगाव चे कौतुक व सहकार्य
अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना चांगले कार्य केल्याबद्दल जिल्हा सचिवांचे कौतुक केले व आर्थिक मदत सुद्धा उपलब्ध करून दिली त्यात प्रामुख्याने जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन ने सुद्धा शालेय व महिलांच्या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सचिव फारूक शेख यांचे गौरव करण्यात आले व विफा तर्फे दहा हजार रुपयांचे धनादेश जळगाव जिल्ह्यस देण्यात आले.

उत्तर महाराष्ट्र ६ जिल्ह्या च्या लीग स्पर्धे साठी परवानगी

उत्तर महाराष्ट्र म्हणून बुलढाणा,जळगाव,धुळे, नंदूरबार, नाशिक व अहमद नगर जिल्ह्यात राज्यस्तरीय स्पर्धे पूर्वी आम्हास १७ व १९ वयोगटातिल मुले व मुलींच्या लीग स्पर्धेची परवानगी द्या अस्या आशयाचे निवेदन सहाही जिल्ह्या सचिव फारूक शेख(जळगाव) रईस काज़ी(धुळे) अर्जुन टिले (नाशिक) योगेश परदेशी (नंदुरबार) गॉडविन डाइट (नगर) व वानखेड़े (बुलढाणा) यांनी दिले असता अध्यक्ष पटेल यांनी त्यास त्वरित मान्यता दिली

फोटो कॅप्शन
१)फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांचा धनादेश देऊन गौरव करतांना अध्यक्ष खासदार प्रफुल भाई पटेल दिसत आहे.
२) उत्तर महाराष्ट्रातील ६ जिल्ह्या मधे लीग ची परवानगी चे निवेदन प्रफुल पटेल यांना देताना ६ जिल्हा सचिव
२) व्यासपीठवार उपस्थित कार्यकारणी दिसत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!