क्राईम

जेष्ठ नागरिक महिलेला मारहाण, सोसायटी सदस्यांनी केला हल्ला

जेष्ठ नागरिक महिलेला मारहाण,
सोसायटी सदस्यांनी केला हल्ला
पोलिसात गुन्हा दाखल

प्रतिनिधी :- सुबोध सावंत

ऐरोली (बातमीदार ) ऐरोली सेक्टर नं.3 नमस्कार गृहनिर्माण संस्थे मधील सभासद श्रीमती मुग्ध गौडा वय वर्ष 71 जेष्ठ नागरिक यांना दि.3/10/2022 रोजी रात्री 10.30 वाजता वीज काटण्यात आली त्यामुळे श्रीमती मुग्धा गौडा व त्यांचा मुलगा सुरेंद्र गौडा हें पाहण्यासाठी मिटर डीपी येते आले असता अगोदर च मुग्धा परुळेकर व मनोज परुळकर वाट पाहत होते जसं ते खाली आले त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्यामध्ये श्रीमती मुग्धा गौडा यांना जबर मारहाण करण्यात आली मारहाण करणारे मुग्धा परुळेकर व मनोज परुळेकर या दोघ पती पत्नी यांनी मुक्का लता बुके व चप्पल हाताचा मनगटात जबर मार लागल्यामुळे त्या खाली पडल्यामुळे त्यांच्या हाताला जबर मार लागला हें सगळे पाहता सुरेंद्र गौडा यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन केला व घटनास्थळी पोलीस येऊन सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आलेश्रीमती मुग्धा गौडा या गंभीर जखमी असल्यामुळे यांना तात्काळ मेडिकल साठी महानगरपालिका वाशी येते पाठवण्यात आले. मेडिकल केली असता सिद्ध झाले कि हाताला फ्रॅक्चर झाले आहे सदर रबाले पोलीस ठाणे यांनी भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम 323,325,34,392,504 गुन्हा नोंदवला. परंतु यांची पार्श्वभूमी पाहिले असता दि.6/4/2019 रोजी गृहनिर्माण संस्था गैर व्यवहारात आजी माजी पदाधिकारी, लेखापरीक्षासह 15 जनांवर गुन्हा दाखल झालेला आहे कोटीचा अपहार केल्याबद्दल या सर्व गोष्टीचा पाठपुरावा सुरेंद्र गौडा यांनी केला त्यामुळे यांना वारंवार नाहक त्रास वीज कनेक्शन कापणे पाणी बंद करणे दुचाकी टायर फोडणे रस्ता बंद करणे असं वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न करत आले या सोडापोटी आजची घटना घडली या सर्व गोष्टी लक्षात घेता सुरेंद्र गौडा व मुग्धा गौडा यांना न्याय मिळेल का?

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!