ताज्या घडामोडी

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला शहरातील कामांची पाहणी

*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला शहरातील कामांची पाहणी*

*पावसाळयापूर्वीची नालेसफाईसह शहर स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*येवला,दि.२३ जून :-* येवला शहरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी पावसाळयापूर्वीची नालेसफाईसह शहर स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी असा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, सार्वजनिक बांधकाम उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, प्रवीण बनकर, राजेंद्र लोणारी, प्रवीण पहिलवान, मुश्रीफ शेख यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी इंद्रनील कॉर्नर, बाजार पेठ, व्यापारी संकुल परिसर, सिध्दी विनायक गणपती मंदिर परिसरातील सुरू असलेल्या नालेसफाई, स्वच्छता व विकास कामांची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!