क्राईम

वृद्ध। महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत धुम स्टाईलवर चोरी;जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

वृद्ध। महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत धुम स्टाईलवर चोरी;जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील निमखेडी शिवरात असलेल्या चंदू अण्णा नगरात रस्त्यावरून पाय जाणाऱ्या वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकी वर धुम स्टाईलवर येऊन जबरीत तोडून नेल्याची घटना घडली आहे. गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय दिलीप पाटील (वय-६०) रा. साई विहार कॉलनी, चंदू अण्णा नगर निमखेडी शिवार जळगाव, हे आपल्या कुटुंबीयास राहायला आहे. गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास वृद्ध महिला रस्त्यावरून पाय जात असताना त्यांच्या मागून नोकरी दोन जण पल्सर गाडीवर येऊन त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीच्या साडेचार तोड्याची सोन्याची मंगलपोज जबरीने तोडून घेऊन पसार झाले.
ही घटना घडल्यानंतर विजय पाटील या वृद्ध महिलेने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दुपारी चार वाजता अज्ञात दोन चोरट्यांना विरोधात तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!