ताज्या घडामोडी

नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड -२०२३ अन् राष्ट्रीय आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव पुरस्काराने अरूण मोरे सन्मानित

नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड -२०२३ अन् राष्ट्रीय आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव पुरस्काराने अरूण मोरे सन्मानित

अधार शोशल फौडेशन बेळगाव (कर्नाटक),महाराष्ट्र गोवा, यांच्या तर्फे नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड -२०२३ व तसेच
राष्ट्रीय आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव पुरस्काराने अरूण मोरे यांना सन्मानित करण्यात आले.तसेच योगेश भाऊ सुरेश गायकवाड यांना देखील समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुणे जिल्हा न्यायाधीश मा. श्री. रवींद्र कुलकर्णी साहेब यांचे हस्ते पुणे येथील पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्र सायन हॉल येथे पुरस्कार देण्यात आला.
अरूण मोरे यांना वयाच्या 15 व्या वर्षापासूनच समाज कार्याची आवड,समाजातील वाडी वस्तीतील नागरी समस्यांवर. तसेच सामाजिक प्रश्नांसाठी
मोर्चे,आंदोलन,उपोषण,या मध्ये नेहमी सहभाग.
विविध कार्यालयातील कामाचा अनुभव घेवुन तसेच विविध कार्यालय मध्ये काम करता-करता,एक समाज सेवेची आवड निर्माण झाली.
अनेक, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने अनेक समाजाभिमुख कामे मार्गी लावली..
यामुळेच जास्तीत जास्त लोकप्रिय होत गेले.
त्यामुळे समाज एका अपेक्षेने पाहु लागला आणि कामाची गती वाढवत गेली. समाजातील गरजवंताना
वैद्यकीय , तसेच शैक्षणिक , वैयक्तिक लाभाचे कामासाठीच नेहमीच तत्पर राहून घरकुल योजना असेल, शासनाच्या विविध विभागाच्या योजना लोकांन पर्यंत पोहचवणे..
शासकीय आधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने समाज्यातील लोकांचे
कागदपत्रे पुर्ण करुन विविध योजनेचा लाभ मिळवून देणे,समाजातील दोन जण किंवा दोन गटातील वाद सामोपचाराने गुन्हा दाखल न होता.पोलीस स्टेशन बाहेर मिटवणे.
कोविड काळात कोविड योद्धा पुरस्कार मिळालेला आहेत. योगेश गायकवाड मिञ परिवार व अरूण मोरे यांच्या मार्गदर्शनाने.
समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करीत असलेले. कलावंत यांचा महात्मा फुले नाट्यग्रह येवला येथे भव्य दिव्य मेळावा घेऊन सर्वानाच पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संदेश पवार, ऋतिक पवार, किरण मोरे, अरविंद पवार, सचिन गवळी… आधी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!