ताज्या घडामोडी

येवला तालुका येथे महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघाचे विभागीय कार्यकर्ता मेळावा नाशिक विभाग येवला येथे राधा कृष्ण लॉन्स मध्ये संपन्न झाला

येवला तालुका येथे महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघाचे विभागीय कार्यकर्ता मेळावा नाशिक विभाग येवला येथे राधा कृष्ण लॉन्स मध्ये संपन्न झाला यासाठी नंदुरबार,जळगांव,अहमदनगर,धुळे,
हिंगोली,संभाजी नगर,बीड,अमरावती,जालना,आदी जिल्यातील पदाधिकारी व ग्राम रोजगार सेवक हजर होते मेळाव्याचे उदघाटक प्रदेशा अध्यक्ष विनोद भाऊ चव्हाण, श्री, दत्तात्रय चव्हाण तात्या
प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे सचिन पाटील सोपान होळंबे,जावेद शेख, रईस पटेल,रमेश कोरडे,भगवान शिंदे,भारत मंदारे,हिंगोली, उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांचे प्रतिमांचे पूजन करून मेळाव्याची सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्यातील कळवण चांदवड,पेठ,इगतपुरी,त्र्यंबकेश्वर, सटाणा,देवळा,मालेगांव,सुरगाणा नाशिक येवला तालुक्यातील पदाधिकारी व ग्राम रोजगार सेवक हजर होते सोमनाथ गवळी विभागीय अध्यक्ष कांतीलाला जाधव,सुनील उबाळे, दौलत ठाकरे इतर पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.कोर कमिटी सदस्य येवला तालुका सचिव प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.विनोद भाऊ चव्हाण यांनी नाशिक ते मुंबई मंत्रालयवर 7 दिवसाचे रोजगार सेवक पायी दिंडी लॉन्ग मार्च चा इशारा दिला आहे त्यावर नियोजन करण्यास सांगितले अशोक कदम यांनी व आभार मानले..यासाठी तालुक्यातील राहुल वाघ,सुनील कदम,भगवान चव्हाण,भगवान रोठे,सुदाम कांबळे, गीताराम आव्हाड, मनिष दिवटे, नरहरी मोरे,अजय लासुरे, गणेश पाठे,दीपक भडकवाड,दीपक आहेर, राहुल रोठे,भाऊसाहेब पगारे,सोपान मोरे,तालुक्यातील सर्व रोजगार सेवक हजर होते मेळावा शांततेत पार पडला
मागण्या खालील प्रमाणे
1) ग्राम रोजगार सेवकांना 15000 रुपये मासिक वेतन मिळावे.
2) ग्राम रोजगार सेवकांना अर्ध वेळ कामगार न म्हणता पूर्ण वेळ कामगाराचा दर्जा मिळावा.
3) ग्राम रोजगार सेवकांना प्रवास करत असतांना त्याचे जीविताचे काही बरे वाईट झाले तर त्यांना 50 लक्ष विमा अपघाती विमा मंजूर करावा.
4) ग्राम रोजगार सेवकांना 2020 ते 2023 चा थकलेले प्रवास भत्ता लवकरात लवकर अदा करावा .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!