ताज्या घडामोडी

लोखंडी सुरा घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला ; एमआयडीसी पोलिसांनी अटक

लोखंडी सुरा घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला ; एमआयडीसी पोलिसांनी अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी जवळील पायघन हॉस्पिटल समोर बेकायदेशीररित्या हातात लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून लोखंडी सुराह हस्तगत केला असेल एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार तलवारी, सुरे , लाठ्या काठ्या, सोबत बाळगण्याची परवानगी देलेली नसताना जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील पायघन हॉस्पिटल समोर संशयित आरोपी आकाश (उर्फ मट्या) अनिल बागडे (वय-२८) रा. संजय गांधी नगर जाखणी नगर जळगाव हातात लोखंडी सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रात्री ८ वाजता संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याबाबत रात्री १० वाजता पो.कॉ किरण पाटील, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आकाश उर्फ मट्या अनिल बागडे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना सुधीर साळवे करित आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!