ताज्या घडामोडी

महिलारत्न श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक विद्यालयात वारकरी वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.*

*महिलारत्न श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक विद्यालयात वारकरी वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.*

*नविन नाशिक -*
*प्रतिनिधी । पंकज सोनार*

आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित महिला रत्न श्रीमती पुष्पाताई हिरे प्राथमिक विद्यालय सावतानगर,सिडको, नाशिक येथे आषाढी एकादशीनिमित्त वारकरी वृक्षदिंडी व रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला.

आषाढी एकादशी निमित्त विद्यालयात वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले होते झाडांची रोपे असलेल्या पालखीचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संस्थेचे सह समन्वयक श्री.श्रीराम शिरसाट सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माया त्रिभुवन मॅडम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री रमेश अहिरे सर तसेच उपमुख्याध्यापक श्री निकुंभ सर बालमंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका सौ रोजेकर मॅडम तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अश्विनी सरोदे,निशा चव्हाण माता पालक शिक्षक संघ, शिक्षक पालक संघाचे सदस्य यांच्या हस्ते वृक्षदिंडी ची आरती करण्यात आली.

सावतानगर परिसरातील महिलारत्न पुष्पाताई हिरे प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पालखी पुजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बालगटासह इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर करत भक्ती गीते,नृत्य,अभंग,भारुड सादर केली. टाळ-मृदंगाच्या नादात “विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला” या भक्तिगीताने संपुर्ण वातावरण विठ्ठलमय झाले .आषाढी एकादशीची माहिती,महिमा सर्व विद्यार्थ्यांना माहित व्हावा, यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.माया त्रिभुवन यांनी माहिती कथन केली. यामध्ये प्रामुख्याने या वारीची परंपरा,संतांचा महिमा, विठूनामाची महती,वारकरी संप्रदाय,त्यांची भक्ती, श्रद्धा,विश्वास इ.चा समावेश होता. यावेळी संपूर्ण वातावरण विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झाले होते.

यावेळी शाळेतील माता पालक कविता वाघ,कमल गिधाडे,जानवी कडमडकर,दिपाली अमृतकर मंचावर उपस्थित होते.सदर कार्यक्रम प्रसंगी नृत्य शिक्षक श्री प्रशांत जगदाळे व सौ काजल जगदाळे यांनी विद्यार्थिनींकडून विठ्ठलाच्या अभंगावर नृत्य करून घेतले.प्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अनिता वाघचौरे,शाळेचे पर्यवेक्षक श्री. राकेश हिरे सर नूतन देसले, अरुणा देसले, अरुणा खैरनार ,प्रवीण हिरे, चिंतामण हिरे, वैशाली निकम, राधा भोये, रवींद्र सूर्यवंशी ,राजेंद्र जगझाप ,पल्लवी खरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.तसेच बालमंदिर विभागाच्या बंधू-भगिनी, पालक बंधू भगिनी, शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेत्तर बंधू भगिनी शाळेतील सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी शालेय परिसरातून वाजत गाजत वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली तसेच शाळेच्या शेजारील दत्त मंदिरात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुनिता महात्मे यांनी केले तर आभार सौ.भारती बागुल यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!