ताज्या घडामोडी

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…..* *येवला तालुक्यातील रमाई, शबरी व मोदी आवास घरकुल योजनेच्या एकूण ४४६ लाभार्थ्यांना पहिल्या हफ्त्याचे वितरण*

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…..*

*येवला तालुक्यातील रमाई, शबरी व मोदी आवास घरकुल योजनेच्या एकूण ४४६ लाभार्थ्यांना पहिल्या हफ्त्याचे वितरण*

*येवला,दि.२४ जुलै :-* राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार विविध घरकुल योजनांचे प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार येवला तालुक्यातील रमाई, शबरी व मोदी आवास घरकुल योजनेचे एकूण ४४६ प्रकरण मंजूर करण्यात येऊन त्यांना पहिल्या हफ्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.

घरकुल योजनांपासून नागरिक वंचित राहू नये यासाठी घरकुल योजनांचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिलेले आहे. त्यानुसार रमाई घरकुल योजनेचे २१८, शबरी घरकुल योजनेचे १३६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून पुढील दोन दिवसात पहिल्या हफ्त्याचे वितरण होणार आहे. तर मोदी आवास घरकुल योजनेचे ९२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यांना येत्या १५ दिवसांत पहिल्या हफ्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर येवला तालुक्यातील १९१ शेतकऱ्यांचे गाई गोठ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. या गोठ्यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. तसेच कलाकार कलावंत मानधन योजनेचे ११ प्रस्ताव मंजूर करण्यात आली असल्याची माहिती स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सावरगाव येथे २९ जुलै २०२४ रोजी तालुकास्तरीय विशेष एकदिवसीय कॅम्पचे आयोजन*

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ करून देण्यात यावा अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार संपर्क कार्यालयासह तालुक्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार दि.२९ जुलै २०२४ रोजी येवला तालुक्यातील सावरगाव येथे सकाळी ९ वाजता तालुकास्तरीय एकदिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!