ताज्या घडामोडी

*तूझी लाडकी बहीण.आदरनिय एकनाथ (दादा )शिंदे* *मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य* पत्र

*आदरणीय एकनाथ (दादा )शिंदे*
*मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य*
पत्र लिहण्यास कारण की, तू सुरू केलीली *लाडकी बहीण माझी* या योजने अंतर्गत आम्हांला तू दर महिना १५००/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हांला नको. याबद्दल तू … गॅस चे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, गृहोपयोगी वस्तूंच्या किंमती कमी कर, तुझ्या भाचा.भाची साठी चांगले रोजगार चालू करून दे,चांगले आरोग्य व चांगली. सुखसोयी करून दे,रस्ते तयार कर, ट्रॅफिकची समस्या सोडण्याचा प्रयत्न कर, जेणे करून तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील.
दादा, आणखी एक विनंती करते.. तुझ्या लाडक्या भाचा -भाची ची शाळेची फी पण कमी करता येते का बघ. जेणे करून त्याला चांगले उच्च शिक्षण सुद्धा घेता येईल.
दादा.. आम्हाला १५००/- रु खरंच देऊ नकोस? पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर दे.
*तूझी लाडकी बहीण….*
आपला:- सलीम शेख ,पोलीस टाईम्स ,पनवेल प्रतिनिधी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!