ताज्या घडामोडी

मच्छिंद्रनाथ देवव्रत धस, गटविकास अधिकारी, येवला, ता. येवला, जि. नाशिक यांनी २००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई

मच्छिंद्रनाथ देवव्रत धस, गटविकास अधिकारी, येवला, ता. येवला, जि. नाशिक यांनी २००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई केले बाबत.ची घटना येवल्यात पुन्हा लाचखोर पकडला ..

यातील तक्रारदार यांचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत २०२२-२०२३ करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तीवर ठेकेदार मार्फत झालेले विकास कामाचे बिल मंजुर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी आलोसे मच्छिंद्रनाथ देवव्रत धस, गटविकास अधिकारी, येवला, ता. येवला, जि. नाशिक यांनी मुल्यांकन बिलाचे २ टक्के प्रमाणे २००००/- रू लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

सदर तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान आलोसे मच्छिंद्रनाथ देवव्रत धस, गटविकास अधिकारी, येवला, ता. येवला, जि. नाशिक यांनी तक्रारदार यांचेकडे २००००/- रू लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दि.०५.०७.२०२४ रोजी स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले असुन त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.

सदरची कारवाई मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधिक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा.श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन पुढील तपास श्रीमती. निलीमा डोळस, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, नाशिक करीत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक तर्फे नागरीकांना आवाहन करण्यांत येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्रातील कार्यालयाशी संपर्क साधुन निर्भिडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी.

कार्यालयीन वेळेनंतर वा सुट्टीचे दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली बाबत वा तक्रारीबाबत माहिती पाहिजे असल्यास खालील मोबाईल कमांक व दूरध्वनीवर संपर्क साधावा महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सोईच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यासाठी लैंडलाईन ते लँन्डलाईन व मोबाईल ते लॅन्डलाईन अशी टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा र सुरु करण्यांत आली असुन सदर क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणालीसंबंधी व करावयाच्या तक्रारीसंबंधी नागरीकांनी संपर्क साधावा,

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!