ताज्या घडामोडी

वहिवाट रस्ता अचानक बंद केल्याने नागरिकांचा आंदोलनाचा इशारा दिला.

प्रेस नोट. नमस्कार पत्रकार मित्रानो सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक प्रसिद्ध करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती.अधिक माहितीसाठी डॉ.प्रमोदअहिरे. मो- +918087005005 ———-

वहिवाट रस्ता अचानक बंद केल्याने नागरिकांचा आंदोलनाचा इशारा दिला. प्रतिनिधी सिडको – सिटी सेंटर रोड लगतच्या आर.डी.सर्कल परिसरातील कर्मयोगी नगर येथील मुख्य रस्त्याला जोडणारा 100 वर्षे जुना वहिवाट रस्ता अचानक बंद केला.नगररचना विभागाने सदर जमीन मालकाला लेखी आदेश दिलेला आहे.या आदेशाची पायमल्ली करून सदर मालकाने पुन्हा रस्त्यात मोठे दगड टाकून कोणतीही पूर्व कल्पना न देता बंद केल्याने परिसरातील रहिवाशांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा इशारा दिला आहे . सिटी सेंटर रोडला जोडणारा वहिवाटीचा रस्ता जागा मालकांनी मनमानी प्रमाणे बंद केल्याने ज्येष्ठ नागरिक, रुग्ण,विद्यार्थी,महिला व इतर सर्व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सदर रस्ता हा नाशिक मनपा च्या नकाशावर अधिकृत असून त्या संदर्भात 2021 साली सुनावणी होऊन मनपा नगररचना विभागाने सदर जमीन मालकाला लेखी आदेश दिलेलाआहे. त्या आदेशाची पायमल्ली करून सदर मालकाने पुन्हा 3 ट्रक दगड टाकून रस्ता बंद केलाआहे.या संदर्भात परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना भेटून लेखी निवेदन दिले. त्यावर मनपा आयुक्तांनी नगररचना विभागाला रस्ता त्वरित मोकळा करण्या संदर्भात सूचना करूनही संबंधित जमीन मालकाला दि.18/6/24 रोजी नोटीस बजावली,असून रस्ता खुला नाही केल्यास अन्यथा फौजदारी कार्यवाही करण्यात येईल असे आदेश दिले होते.15 दिवस होऊन अद्याप पर्यंत जमीन मालकांने वहिवाट रस्ता मोकळा केलेला नाही. परिसरातील सर्व नागरिकांची गैरसोय होत आहे.या बाबत संबंधित लोकप्रतिनिधी,आमदार, खासदार,पोलीस ठाणे , पोलिसआयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.त्यावर मनपा नाशिक यांनी त्वरित कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कर्मयोगी नगर परिसरातील त्रस्थ रहिवाशांनी दिलाआहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!