ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे राबविण्याबाबत येवल्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून आढावा*

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे राबविण्याबाबत येवल्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून आढावा*

*नाशिक,येवला,दि.३० जून :-* महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज येवला संपर्क कार्यालय येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

यावेळी कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दीपक लोणारी, राजेश भांडगे, भगवान ठोंबरे, सचिन कळमकर,नवनाथ काळे, संतोष खैरनार, पांडुरंग राऊत, भूषण लाघवे, संजय पगार, भाऊसाहेब धनवटे, विकी बिवाल, सुमित थोरात, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, मलिक मेंबर, विशाल परदेशी, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य सरकारच्या वतीने घोषणा करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या यशस्वीतेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला मतदारसंघात १ जुलै ते १५ जुलै २०२४ यादरम्यान विशेष अर्ज भरण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येवला मतदार संघातील प्रमुख गावांमध्ये विविध ठिकाणी १८ केंद्र सुरू केले आहे. तसेच मतदारसंघातील सर्व सेतू केंद्रांवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतः लक्ष देऊन जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी या बैठकी प्रसंगी केल्या.

*माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाची पाहणी*

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प येवला शहरामध्ये उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाहणी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!