ताज्या घडामोडी

शहरातील प्रसिद्ध व्यापारी व्यावसायिक श्री पी बी उर्फ पुंजाराम भानुदास शिंदे यांनी पूर्ण केले नर्मदा परिक्रमा आणि श्रीक्षेत्र गाणगापूर पाई वारी*

*शेवगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी व्यावसायिक श्री पी बी उर्फ पुंजाराम भानुदास शिंदे यांनी पूर्ण केले नर्मदा परिक्रमा आणि श्रीक्षेत्र गाणगापूर पाई वारी*

{ अविनाश देशमुख शेवगांव }9960051755


*याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि परम पूज्य दादाजी वैशंपायन दत्त मंदिर यांचे भक्त प्रवासी संघटना चे सदस्य पी. बी. उर्फ पुंजाराम भानुदास शिंदे यांनी पूर्ण केले नर्मदा परिक्रमा आणि श्रीक्षेत्र गाणगापूर पायी प्रवास पूर्ण केला त्याबद्दल शेवगाव शहरासह तालुक्यातील दत्त भक्त त्यांचे व्यापारी मित्र यांचेकडून त्यांच्यावर अभिनंदन आचा वर्षाव होत आहे सुमारे चार राज्य मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश आधी राज्यातून सुमारे तीन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास पायी प्रदक्षिणा 112 दिवसांमध्ये अखंड पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा छोटेखानी सत्कार शेवगाव शहरांमध्ये सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अविनाश देशमुख महसूल चे कर्मचारी श्री कानिफनाथ ढाकणे भारतीय आयुर्विमा महामंडळ एल.आय.सी. च्या प्रतिनिधी सो मनीषा डांबे व नितीन भोसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा छोटे खाणी सत्कार शाल श्रीफळ व पेढे भरून करण्यात आला त्यांनी संपूर्ण प्रवासाचे वर्णन आलेल्या कटू गोड आठवणी त्या त्या राज्यातील भाविक भक्तांनी आणि समाजसेवकांनी केलेली मदत याचे अनेक किस्से सांगितले अतिशय संन्यास्त जीवन जगून सुमारे पावणेचार महिन्यांचा प्रवास करून सुखरूप गावी पोहोचल्यामुळे त्यांचे सर्वच अस्तरातून अभिनंदन केले जात आहे गेली अनेक वर्षे ते दादाजी वैशंपायन दत्त मंदिर व भाविक भक्त यांच्यासोबत शेवगाव ते श्री क्षेत्र गाणगापूर पायी दिंडी प्रवास करत असतात अतिशय खडतर असा प्रवास पूर्ण करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल शेवगाव शहरातील सर्व बाजारपेठेतील व्यापारी मित्रपरिवार आणि हितचिंतक यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या त्यांच्या हातून अशीच दत्त सेवा घडो हीच या निमित्ताने प्रार्थना*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!