ताज्या घडामोडी

सौ.विनिता अमोल सोनवणे या “सुकन्या २०२४” पुरस्काराने सन्मानित..

*सौ.विनिता अमोल सोनवणे या “सुकन्या २०२४” पुरस्काराने सन्मानित…*
नाशिक येथील महावीर इंटरनॅशनल व नाशिक जिल्हा महावीर समाज हे महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील गुणवंत, आदर्श, कर्तुत्वान व प्रगतशील महिलांना त्यांच्या कार्याबद्दल, योगदानाबद्दल, समाजकार्याबद्दल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “सुकन्या” अवॉर्ड ने सन्मानित करतात. श्री.कालिका देवी मंदिर संस्थान – हॉल नाशिक येथे अंदरसुल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ. विनिता अमोल सोनवणे यांना मिस ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन डॉ.नमिता कोहोक, मा.प्रवीण मोदी, मा.लिना चोपडा, मा.संगीता गन्ना, हिंदुस्तान लिव्हरचे मालक मा.उषा शाह, मा.कोकीला जव्हेरी, मा.सुवर्णा काले, नाशिकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड साहेब, नेमिनाथ जैन संस्थेचे राजेंद्र बाफना व संगीता बाफना यांच्या हस्ते “सुकन्या २०२४” पुरस्काराने गौरवण्यात आले.
अंदरसुल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ.विनिता अमोल सोनवणे यांच्या या यशाबद्दल अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक तथा कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकवाड सह सर्व संचालक मंडळ, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!