ताज्या घडामोडी

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा.

*एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील वरिष्ठ विज्ञान शिक्षिका मयुरी एंडाईत या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सी.वी.रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
डॉ.चंद्रशेखर वेंकट रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. १९३० मध्ये, प्रकाश विखुरण्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.ते व त्यांचे मित्र कृष्णन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी “सुधारित विखुरणे” असे संबोधले, पण त्याला रामन परिणाम म्हणून ओळखले जाते.तसेच २८ फेब्रुवारी हा दिवस भारत सरकारतर्फे दरवर्षी “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो.
तसेच इ.९वीचे विद्यार्थी आदर्श देशमुख, प्रणिता कचरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शिक्षिका धनश्री कळांगे, निदा फारुकी, शिक्षक अमोल आहेर, प्रिन्सिपल अल्ताफ खान व अध्यक्षा मयुरी एंडाईत यांनी विज्ञान दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास गणेश सोनवणे, दीपक खैरनार, पारस भगत, राजेश कांबळे, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, मोनिका कळांगे, शोभा निकम, तरन्नुम सैय्यद, प्रतिक्षा चव्हाण, सायली भालेराव, पूनम जमधडे, श्वेता बोरावके सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सोनाली साताळकर यांनी केले तर आभार शिक्षक अजीम पटेल यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!