ताज्या घडामोडी

अंगणगाव येवला औद्योगिक सहकारी वसाहत निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम* *येवला औद्योगिक वसाहतीत मंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व*

*अंगणगाव येवला औद्योगिक सहकारी वसाहत निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम*

*येवला औद्योगिक वसाहतीत मंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व*

*नाशिक,येवला,दि.२५ जानेवारी :-* अंगणगाव येवला औद्योगिक वसाहत निवडणुकीत निर्विवाद यश मिळवत मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. येवल्याच्या जनतेने मंत्री छगन भुजबळ यांच्या विकासाला पाठिंबा देत पुन्हा एकदा त्यांचे वर्चस्व कायम केले आहे.

आज झालेल्या येवला औद्योगिक वसाहत निवडणुकीत आठही जागा मंत्री छगन भुजबळ यांच्या गटाने जिंकल्या आहे. याआधी ४ जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या सर्व विजयी उमेदवारांचे मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.

*या निवडणुकीत विजयी उमेदवारांची नावे*

अंबादास बनकर, अरुण भावसार, भोलानाथ लोणारी, सुकृत पाटील, राजेश भंडारी, अनिल कुक्कर, शाम कंदलकर, प्रवीण पहिलवान हे विजयी झाले आहे.

*बिन विरोध निवडून आलेले उमेदवार*

योगेंद्र वाघ, सुहास अलगट, चारुशीला काबरा, जयश्री काळे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!