ताज्या घडामोडी

वली बाबा दर्गा शरीफ आवाटी येथे सोहेल पठाण यांचा सत्कार

वली बाबा दर्गा शरीफ आवाटी येथे सोहेल पठाण यांचा सत्कार

करमाळा : प्रतिनिधी बबलू पठाण

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) करमाळा शहराध्यक्षपदी सोहेल कादर पठाण यांची निवड झाल्याबद्दल आवटी दर्गा येथे खादिम इरफान कादरी, खादिम गुलाम-नबी कादरी, यांच्याकडून दर्ग्याच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना पठाण म्हणाले की, करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध असलेले सर्वांचे श्रद्धास्थान आवटी वली बाबा दर्ग्याचे असणारे विविध प्रश्न व समाजातील विविध भाविकांच्या असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडविणार आहे असे नवनियुक्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सोहेल पठाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी बबलू पठाण, सरदार जमादार, विशाल खांडेकर, डॉ.भारत देवळेकर सरकार व सर्व समाजातील युवक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!