ताज्या घडामोडी

नाशिक परीक्षेञ विशेष महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे ,तर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी विक्रम देशमाने,

नाशिक परीक्षेञ विशेष महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे ,तर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी विक्रम देशमाने,
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील ६४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच बुधवारी झाल्या. यामध्ये ठाणे शहर सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांची नाशिक परिक्षत्रेचा विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्या अगोदर ते नाशिक शहर उपायुक्त, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, सोलापूर शहर पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त ठाणे, सह आयुक्त ठाणे – मोठ्या महानगरात कायदा व सुव्यवस्था सुयोग्य पद्धतीने हाताळले आहे. त्याचा अनुभव नाशिक परिक्षेत्रास कामी येईल.

ठाण्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची नाशिकचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे नाशिकच्या सर्व पोलीस यंत्रणेला नवा चेहरा प्राप्त झाला आहे.

नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक बीजी शेखर पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच शहराच्या पोलीस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे जिल्हा, शहर आणि विभाग अशा सर्व स्तरावर नव्या नियुक्त झाल्याने, पोलीस विभागाला नवा चेहरा प्राप्त झाला आहे. विभागाअंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षकांच्या बदल्या दोन आठवड्यापूर्वीच करण्यात आलेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार झालेल्या या बदल्यामुळे पोलीस विभागात मोठ्या प्रमाणात कांदेपालट झालेली आहे. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची नाशिकचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. ते यापूर्वी देखील २०१२ ते १४ या कालावधीत नाशिकमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. ठाणे शहराचे पोलीस सहायुक्त दत्तात्रय
कराळे यांची नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांची नियुक्ती मुंबईत सहाय्यक उपमहानिरीक्षक पदी झाली आहे.जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमप यांच्या बदलीमुळे नाशिक ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. सध्याचे विशेष पोलीस उपनिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांची बदली झालेली, असून त्यांची अद्याप नियुक्ती झालेली नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!