ताज्या घडामोडी

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शिक्षण संकुलात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन संपन्न.

*मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शिक्षण संकुलात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन संपन्न.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल,सेमी इंग्लिश व ज्यु. कॉलेजमध्ये शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रा.आर.बी.गायकवाड हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पुजन व सहकार महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना अजहर खतीब यांनी केली.यानंतर मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे सुरुवात फीत कापुन करण्यात आली.या विज्ञान प्रदर्शनात इ.४थी ते इ.१०वी च्या एकूण ४३२ विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम, प्रयोग बनवून आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक, पर्यावरणपूरक, सौर ऊर्जेवर चालणारे, कूलर, गणित सोडविण्याचे सोपे उपाय, हायड्रॉलिक क्रेन, वॉटर टँक अलार्म, शेताची रक्षण प्राणी पासून करण्यासाठी मोठ्या आवाजाची गण, वोलक्यानो, कुट्टी कटर मशीन यासह अनेक प्रात्यक्षिक बनवून आलेल्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.तसेच प्रतीक्षा चव्हाण, मयुरी एंडाईत, अमोल आहेर, पारस भगत यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रात्यक्षिकांचे परीक्षण केले. यानंतर येणाऱ्या ख्रिसमस सणा निमित्त जानवी सौंदाने हिने आपले भाषण सादर केले. के.जी.चा विद्यार्थी शिवांश वडाळकर याने सांताक्लॉजचा वेष परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले.
याप्रसंगी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक जीवन गाडे, उज्ज्वल जाधव, अंदरसुल ग्रामपालिकेच्या मा. सरपंच व विद्यमान सदस्य प्रा.विनिता अमोल सोनवणे, रामनाथ काका एंडाईत, भागीनाथ थोरात, बाबासाहेब सोनवणे, मंगेश शिंदे, ज्यु. कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, इंग्लिश मिडियमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, दीपक खैरनार, अजीम पटेल, पारस भगत, गणेश सोनवणे, सचिन घोडके, राजेश कांबळे, अर्चना एंडाईत, नीलिमा देशमुख, शर्मिला पवार, साक्षी देशमुख आदी सह सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल आहेर यांनी केले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!