ताज्या घडामोडी

मका व्यापाऱ्याची मनमानी थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने

मका व्यापाऱ्याची मनमानी थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने

प्रतिनिधी ममदापूर

निवेदन
मा. मुख्य सचिव साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती येवला
आम्ही वरील विषयानुसार विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की यावर्षी पाऊस अतिशय कमी झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे कधी कांदे भाव पडले तर कधी कांदे सडले कधी गारपेट तर कधी दुष्काळ या सर्वांवर मात करीत बळीराजा आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत आपल्याकडे दोन प्रामुख्याने पिके घेतले जातात कांदा व मका परंतु पाऊस अतिशय कमी झाल्यामुळे मकाचे उत्पन्नात मोठी घट झालेली आहे अशा असताना देखील येवल्यात मात्र व्यापारी व्यापाऱ्यांची मनमानी कारभार सुरू आहे लिलाव चालू व बंद हे वेळेवर केले जात नाही तासान तास शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते मकाला तोंड पाहून भाव ठरविला जातो व सर्व सामान्य शेतकऱ्यांची लूट ही सर्रासपणे केली जात आहे मक्याचे पैसे वेळेवर भेटत नाही त्यात शेतकऱ्यांना अरेरावेची भाषा वापरली जाते विकलेल्या मका चे पैसे 15–15 दिवस भेटत नाही शेतकरी चकरा मारून थकून गेले हा सर्व प्रकार रासरोसपणे चालू असताना मार्केट कमिटी मात्र बघ्याची भूमिका घेते असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि म्हणून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही आपणास लेखी निवेदन देऊन खालील मागण्या मागत आहोत
1)मकाचा लिलाव वेळेवर सुरू करत नाही त्यामुळे त्याचा टाईम टेबल जाहीर करावा
2) विकलेल्या मालाचे पैसे 24 तासात देणे बंधनकारक असताना देखील पंधरा-पंधरा दिवस पैसे दिले जात नाही म्हणून ती रक्कम रोख स्वरूपात देण्यात यावी 3)शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचे च्या पैसे संदर्भात तक्रार निवारण कक्ष सुरू करावे करून तसेच जाहिरात करावी मार्केट
4)अचानक बंद न ठेवता 24 तास आधी जाहीर नोटीस बोर्डवर फलक सूचना लिहिण्यात यावी

साहेब वरील मागण्या या शेतकरी हिताच्या आहेत आपण तात्काळ दखल घेऊन आम्हाला लेखी स्वरूपात पत्र व्यवहार करावा अन्यथा स्वारी व पक्षाच्या वतीने महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!