ताज्या घडामोडी

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पिकं कर्ज त्वरित माफ करा:-मराठा मावळा संघटनेची मागणी;

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पिकं कर्ज त्वरित माफ करा:-मराठा मावळा संघटनेची मागणी;

येवला

सततचा दुष्काळामुळे व अवकाळीने शेतकऱ्यांची खरीप हंगामातील संपुर्ण पीके वाया गेली आहे. तसेच रब्बीचा हंगामही पूर्णपणे संकटात आहे. शेतकऱ्यांनी पिक कर्ज व हातउसणवार घेऊन लागवड केली होती;परंतू दुष्काळामुळं अवकाळीने शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले असल्यानं शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पिक कर्ज माफ करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.शेतकऱ्यांनी पिके कर्ज घेवून उभी केलेली पिके पूर्णत: नष्ट झाल्याने शेतकऱ्याचे कष्ट वाया गेले आहे.सतत दुष्काळ व अवकाळी संकटाचा सामना करत आहे;परंतू सततच्या या परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. गोरगरीब शेतकरी आणि शेतमजुरांपुढे उपजीविकेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जणावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभिर बनत चालला आहे. या सर्व परिस्थितीपुढे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. यामुळे दिवसेंदिवस शेतकरी,शेतमजूर यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.
अशा परिस्थितीत कर्जमाफी, वीजबिल माफी बरोबरच शेतकरी, शेतमजुरांना उपजीविकेसाठी सरकारन काहीतरी मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा देणे क्रमप्राप्त झाले आहे. सर्व बाबींचा गांभिर्याने अभ्यास करून दुष्काळग्रस्त भागातील कुटुंबांना उपजीविकेसाठी राज्य सरकारनं योग्य निर्णय घेवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणी मराठा मावळा संघटनेच्या वतीने आज येवला तहसीलदार आबा महाजन यांना,पुरवठा अधिकारी बी.ए हावळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा मावळा संघटनेचे नासिक जिल्हा अध्यक्ष देविदास गुडघे पाटील, सह रामदास गुडघे,पत्रकार दिपक उगले,अरूण गुडघे, बापू म्हस्के, राहुल वाघ,भाऊसाहेब गाढे, संदीप गुडघे,विष्णु पवार, रामदास दाणे,रावसाहेब नागरे, साहेबराव दाणे आदिंसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया:-
काही भागात दुष्काळ तर काहीं भागात अवकाळी परिस्थितीमुळे व मागील कोरोणा महामारिमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे.शेतकरी दरवर्षी उरावर घाव पेलवत आहे.शासन दरबारी शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळत नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली होती.त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.अशा दुष्काळी परिस्थितीत तरी सरकारने दिलेला शब्द पाळावा व शेतकऱ्यांचे पिकं कर्ज माफ करावे.
“देविदास गुडघे पाटील”
मराठा मावळा संघटना नासिक जिल्हा अध्यक्ष

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!