ताज्या घडामोडी

राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ विणकारांनी घेण्यासाठी भाजपा विणकर प्रकोष्ठच्या वतीने विणकर जनजागृती मेळाव्याचे भव्य आयोजन*

*राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ विणकारांनी घेण्यासाठी भाजपा विणकर प्रकोष्ठच्या वतीने विणकर जनजागृती मेळाव्याचे भव्य आयोजन* येवला- भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ठच्या वतीने राज्यात नुकत्याच लागू झालेल्या एकात्मिक व शाश्वत वस्रोद्योग धोरण अंतर्गत विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष विणकारांना मिळावा या हेतूने येवले शहर व परिसरातील सर्व विणकारांचा भव्य असा विणकर जनजागृती मेळावा काल येथील श्री हिंगलाज माता मंगल कार्यालयात विणकर प्रकोष्ठ चे प्रदेश अध्यक्ष श्री मनोज दिवटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विणकर प्रकोष्ठ चे उत्तर महाराष्ट्र संयोजक श्री मनोज भागवत यांनी केले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री मनोज दिवटे यांनी गेली वर्ष भर राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाच्या निर्मितीपासून ते शासन निर्णय GR निघेपर्यंत चा प्रवास विशद केला.राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण समितीवर सदस्य म्हणून काम करतांना आपण ज्या ज्या विणकर हिताच्या मागण्या मांडल्या त्या सर्व मागण्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे,माधवजी भंडारी यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्याचे पाच वर्षाकरिता एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 मध्ये अंतर्भूत करून जाहीर केल्या. या योजना पुढील प्रमाणे- 1)गणेश चतुर्थीनिमित्त पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणीत व नोंदणीकृत विनकरांना उत्सव भत्ता योजना- या योजनेतील पात्र महीला विणकराला दरवर्षी रूपये 15000/ व पुरुष विनकराला रूपये 10000/ प्रोत्साहन भत्ता थेट त्याच्या बॅक खात्यात जमा होईल. 2)हातमाग विनकर कुटुंबांना प्रतीमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याबाबत- या योजनेत पात्र विणकराला 200 युनिट पर्यंत विज मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 3) एकात्मिक व शाश्वत्व वस्त्रोद्योग धोरण 2023 28 अंतर्गत हातमाग विनकारांना केंद्र पुरस्कृत कच्चामाल पुरवठा योजनेतील (आर एम एस एस)धाग्यावर हातमाग विनकारांना अतिरिक्त अनुदान देणे बाबत – या योजनेमध्ये पात्र विणकाराला कच्चामाल खरेदीवर राज्य सरकारतर्फे 15 टक्के अनुदान देण्यात येईल यापूर्वी केंद्र सरकार कच्चामाल खरेदीवर 15 टक्के अनुदान देत होतं असे एकूण या पुढील काळात तीस टक्के कच्चामाल खरेदीवर अनुदान मिळणार आहे. 4) पारंपारिक वस्तु उद्योग विकारांना बक्षीस योजना – हातमागावर काम करणाऱ्या विणकारांनी तयार केलेल्या वानासाठी राज्यस्तरावर स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेत पात्र ठरणाऱ्या विणकाराला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहे. 5) राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव मार्केट योजना सुरू करणे बाबत – या योजनेमुळे पावरलूम धारकांना निश्चितपणे चांगल्या प्रकारची ऑर्डर मिळणार असून त्यांच्या उद्योग व्यवसायाला वाढीला चालना मिळणे शक्य होणार आहे. 6)वस्त्रोद्योग विभागाचे बोधचिन्ह आणि बोधवाक्य निश्चित करण्याबाबत – राज्यातील हातमाग विणकर व्यवसायाचे बोधचिन्ह असावे किंवा बोधवाक्य असावे जेणेकरून त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी मदत होईल याकरता राज्य सरकारने बोधचिन्हाचे व बोधवाक्याचे निश्चितीकरण केलेले आहे. अशा प्रकारे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्याकरिता विणकर बांधवांनी आवेदनासह सर्व कागदपत्र विहीत नमुन्यात मुदतीत संबंधित विभागाकडे जमा करावेत असे यावेळी आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता भाजपा नगरसेवक प्रमोद सस्कर,विणकर प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष पंकज पहीलवान तालुका अध्यक्ष संतोष भरते जिल्हा कार्यकारणी सदस्य आशिष भोजने किशोरीताई व्यवहारे, मकबुल अहमद त्याचप्रमाणे प्रदेश कार्यकारणी सदस्य अब्दुल रहमान शिरीष पेटकर राजूभाऊ वडे गणेश वायडे दत्ता जगझाप, त्याचप्रमाणे असंख्य विनकर बांधव उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!