ताज्या घडामोडी

जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे अवैध धंद्याविरोधातील विशेष पथक व चांदवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत सत्तर लाखांचा गुटखा जप्त*

*जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे अवैध धंद्याविरोधातील विशेष पथक व चांदवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत सत्तर लाखांचा गुटखा जप्त*

पोलीस टाईम्स न्युज: सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड:* नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय शहाजी उमप यांच्या अवैध धंद्या विरोधातील मोहिमेत विशेष पथक क्रमांक सहा व चांदवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत गुप्त माहितीच्या आधारे मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड येथील हॉटेल माथेरान समोर आयशर ट्रक क्रमांक MH- 04- LE- 3225 ही चालक हार्दिक सोमरीया (वय 27 वर्ष) राहणार भिवंडी हा मालेगाव बाजू कडून मुंबईकडे जात असताना त्याच्या ताब्यातील आयशर ट्रकसह जात असताना विशेष पोलीस पथकाने त्यास थांबवले असता त्याच्या आयशर गाडीत महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू गुटखा व पान मसाला विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन जाताना मिळून आल्याने त्यास गाडीसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यात एकूण 105 पोते गुटखा व पान मसाला मिळून आला. त्याची किंमत एकूण 50 लाख 8 हजार पाचशे रुपये व आयशर ट्रक गाडीची किंमत वीस लाख रुपये असा एकूण 70 लाख आठ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरच्या कारवाईत चांदवड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन करत आहे.
सदरच्या या विशेष कारवाईत नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांचे विशेष पथक क्रमांक सहा व चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, त्याचप्रमाणे अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी यांची टीम सदर कारवाईत सहभागी झाली होती.
यात चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, विशेष पथकातील पीएसआय व्ही.एस. लोंढे, पोलीस हवालदार गोपीनाथ बहिरम, हेमराज गोपीचंद पवार, मनोज कुमार सोनजे, सुजित इंगळे, महिला पोलीस कल्पना राजाराम लहांमगे, धनंजय देशमुख, तसेच अन्नसुरक्षा प्रशासन अधिकारी सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे, अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन, मनीष सानप, उमेश सूर्यवंशी हे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!