ताज्या घडामोडी

दराडे बंधूंच्या प्रयत्नांना यश; १०० विद्यार्थ्यांना यावर्षी मिळणार प्रवेश धानोरे बीएएमएस महाविद्यालयाला मान्यता

दराडे बंधूंच्या प्रयत्नांना यश; १०० विद्यार्थ्यांना यावर्षी मिळणार प्रवेश

धानोरे बीएएमएस महाविद्यालयाला मान्यता

येवला, ता. ११ धानोरे (ता. येवला) येथील मातोश्री शिक्षण संस्था संचलित मातोश्री आयुर्वेद महाविद्यालयाला (बीएएमएस) शासनाने मान्यता दिली. त्यामुळे येथे १०० विद्यार्थी यंदापासूनच प्रवेश घेऊ शकणार आहेत. आमदार दराडे बंधूंच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती

आयोग नवी दिल्ली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मुंबई यांनी नवीन महाविद्यालयात सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी तपासात या शैक्षणिक वर्षापासून नवीन महाविद्यालयास परवानगी दिली आहे. दराडे बंधूच्या पुढाकाराने ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्थेचे अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिक्षणशास्त्र, शाळा, महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय,

फार्मसी, कृषी महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, बीएचएमएस, बीएएमएस कनिष्ठ आदी महाविद्यालय सुरू आहेत. बाभुळगावसह एकलहरे कॅम्पस येथेही

MATOSHRI ATURVED COLLEGE

धानोरे मातोश्री आयुर्वेदिक महाविद्यालयाची इमारत.

पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

■ जे विद्यार्थी पूर्वीच प्रवेशाकरिता पात्र होते; परंतु कुठेही प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना नव्याने परवानगी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार असून, अशा विद्यार्थ्यांनी ११ व १२ नोव्हेंबरला आपला ऑनलाइन अर्ज भरायचा असून, त्यांना प्रवेशाची एक नवी संधी मिळणार आहे. महाविद्यालयांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांकरिता तसेच नवीन महाविद्यालयांतील प्रवेशाकरिता पात्रता पूर्वीपेक्षा पाच पसेंटाइलने घटवली. अशा विद्यार्थ्यांकरिता नव्याने १३ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू होत असून, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू असून आता संस्थेचे हे तिसरे आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू झाले आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रुपेश दराडे यांनी दिली.

येवला तालुक्यात संस्थेचे दुसरे आयुर्वेद महाविद्यालय सुरू होत असून, दरवर्षी तालुक्यातील व परिसरातील २०० विद्यार्थ्यांना आयुर्वेद डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दोन रुग्णालयांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.

– रूपेश दराडे, संचालक

जिल्हाभरातील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन नामांकित कंपन्यांत नोकरी करीत आहेत. यावर्षीपासून नंदुरबार येथेही संस्थेचा कॅम्पस सुरू झाला आहे. धानोरे येथील कॅम्पसमध्ये महाविद्यालयासोबतच उपलब्ध अनुभवी डॉक्टरांच्या उपस्थितीत १०० खाटांचे रुग्णालय तसेच महाविद्यालयात उपलब्ध आहे. अद्यावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांची पडताळणी करत शासनाने नवीन महाविद्यालयास परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे संचालक

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!