ताज्या घडामोडी

मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयानंतर सकल मराठा समाज, चांदवड साखळी उपोषणाची सांगता

<img src="http://policetimes.co.in" alt="*मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयानंतर सकल मराठा समाज, चांदवड साखळी उपोषणाची सांगता.*
पोलिस टाईम्स न्युज : सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड* : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढाईत सरकारने दोन महिन्यांचा कालावधी मागितल्याने दुसऱ्या टप्प्यात चालू असलेले उपोषण सरकारच्या शिष्टमंडळांनी अंतरवली सपाटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने व प्रदीर्घ यशस्वी चर्चा केल्याने उपोषण मागे घेतल्याची भूमिका जाहीर केली व सरकारला ही आता शेवटची वेळ असून सरसकट मराठा आरक्षण 24 डिसेंबर पर्यंत द्यावे अशी मागणी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणापासून नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्याने मोठ्या प्रमाणात भाग घेऊन जिल्ह्याचे हॉटस्पॉट चांदवड केले. यात रस्ता रोको, टायर जाळून निषेध, आमदारांना मराठा कार्यकर्त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागणे, भजन, कीर्तन असे दररोजच कार्यक्रम केल्याने सतत चांदवड चर्चेत राहिले

या साखळी उपोषणात तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प श्याम महाराज गांगुर्डे यांनी कीर्तनातूनच मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आंदोलनावर व आरक्षणासंबंधी आपल्या शैलीत शासनावर जोरदार प्रहार केले व कीर्तनातूनच मराठा आरक्षणाची मागणी व मराठा आरक्षण कशासाठी याची सविस्तर कीर्तन सेवाच दिली.सायंकाळी उपोषण मागे घेतल्याचे मनोज जरांगे पाटलांनी घोषित केल्याने चांदवड तालुका सकल मराठा समाजाने “लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जिवंत राहिला पाहिजे” हे म्हणतच साखळी उपोषणाची सांगता केली.

यावेळी सकल मराठा समाजाचे शिरीष भाऊ कोतवाल, प्रकाश शेळके, गणेश निंबाळकर, दीपक हांडगे, सुनीलआण्णा सोनवणे, धनंजय पाटील, सागर देशमुख, पत्रकार संजय जाधव, रोशन गांगुर्डे, संभाजीराजे सोनवणे, कैलास कोतवाल, दौलत सोनवणे, नंदकुमार कोतवाल, सचिन कोतवाल, कवी विष्णू थोरे, गटलू कोतवाल, गाडे फौजी, अँड.भरत ठाकरे, पप्पू नलावडे, पंकज काळे, पप्पू कोतवाल, जितू कोतवाल, अनिल कोतवाल, पप्पू भालेकर, सोमनाथ काटे, समाधान आहेर यांचे सह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.” />

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!