ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक साडेतीनशे वर्ष पूर्ण होताना चांदवड तालुक्यात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन*

    *छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक साडेतीनशे वर्ष पूर्ण होताना चांदवड तालुक्यात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन*

    पोलिस टाईम्स न्युज : सुनिलआण्णा सोनवणे
    *चांदवड*:

    चांदवड देवळा मतदार संघात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकास साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त शिवस्वराज्य यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेनिमित्त देवळा तसेच चांदवड तालुक्यातील प्रत्येक गावागावात घराघरात व मनामनात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहचवावे हा उद्देश ठेवून आज चांदवड तालुक्यातील कांचन बारी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयस्तंभास नतमस्तक होऊन या ठिकाणापासून या यात्रेस सुरुवात केली. सदर ठिकाणी कानमंडाळे गावचे सरपंच यांनी नारळ वाढवून शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत केले.

    चांदवड व देवळा परिसरात सदर यात्रेचे आयोजन करण्यात आले असून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकास साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त शिवस्वराज्य यात्रा चांदवड तालुक्याचे युवा नेतृत्व भूषण कासलीवाल यांच्या सौजन्याने आयोजित केली आहे

    . या यात्रेनिमित्त देवळा तसेच चांदवड तालुक्यातील प्रत्येक गावागावात घराघरात व मनामनात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोचवावे हा उद्देश ठेवून आज चांदवड तालुक्यातील व परिसरातील प्रत्येक गावागावांमध्ये शिवभक्त प्रणाली पाटील, राहुल कासोदे, रंजीत कागलकर वैष्णवी चव्हाण श्रुती चौधरी संकेत तंबाके विलास अमोघे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान व माहिती सांगून महाराजांच्या काळात झालेल्या समाज उपयोगी निर्णय यांची माहिती देण्यात येत होती.धोडंबे गट त्याचप्रमाणे तळेगाव रोही गटामध्ये न्हणावे, पन्हाळे, रेडगाव, वाहेगाव साळ या परिसरातील प्रत्येक गावागावांमधे
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील व्याख्यानांमुळे जन माणसात जागृती होत असून सदर यात्रेचे स्वागत प्रत्येक गावागावात होत आहे.

    Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!