ताज्या घडामोडी

मनमाड उपजिल्हा रुग्णालयात* *अपुऱ्या स्टाफ मुळे* *रुग्णांच्या जीव धोक्यात.

*मनमाड उपजिल्हा रुग्णालयात* *अपुऱ्या स्टाफ मुळे* *रुग्णांच्या जीव धोक्यात.* *
भारती धिंगान (प्रतिनिधी)* नाशिक. नांदगाव तालुक्यातील मनमाड शहर हे समिश्र लोकवस्तीचे शहर असून या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या संख्येने आहे. असे असतांना जिल्हा रुग्णालयात अपुरा स्टाफ असल्याने रुग्णांचे जीव धोक्यात असल्याचे समजते. रुग्णास कोण डॉक्टर नर्स व स्टाफ उपचार देतो याचे संभ्रम निर्माण झाले आहे. 108 ॲम्बुलन्स सुविधा असून ती नसल्यासारखी आहे. रुग्णास पुढील उपचार घेण्यासाठी मालेगाव नाशिक या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी 108 तात्काळ उपलब्ध होत नाही. पुढील योग्य उपचार होत नसल्याने रूग्ण दगावल्याच्या अनेक घटना घडल्या असल्याने रि.पा.ई.(ग्रामीण) मा.नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे व नगरसेवक तथा रि.पा.ई. (ग्रामीण)जिल्हा सरचिटणीस गंगा भाऊ त्रिभुवन असे आशियाचे निवेदन मा.आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांना दिल्याचे समजते. सदरच्या निवेदनावर तात्काळ योग्य ती कार्यवाही न झाल्यास रि.पा.ई. कुठलीही पूर्व सूचना न देता तीव्र अंदोलन हाती घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पी. आर. निळे (जिल्हा संपर्कप्रमुख) कैलास भाऊ अहिरे (तालुकाध्यक्ष) दिलीप भाऊ नरवडे (शहराध्यक्ष) सुरेश भाई शिंदे, दिनकर धीवर, रुपेश आहिरे, रवींद्र खैरनार, प्रदीप घुसळे, पंडित भालेराव, विलास अहिरे, भीमराव उबाळे, धनंजय आवचारे, अशोक अहिरे, यांचे निवेदनावर सह्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!