ताज्या घडामोडी

पोलीस हक्क संघर्ष संघटना महिला आघाडी प्रदेशअध्यक्ष या पदावर सौ अलका जेजुरकर यांची निवड

पोलीस हक्क संघर्ष संघटना महिला आघाडी प्रदेशअध्यक्ष या पदावर सौ अलका जेजुरकर यांची निवड
———————————————
जालना दिनांक ३ ( प्रतिनीधी )
पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटना चे महिला आघाडी या पदावर सौ अलका ताई दीपक जेजुरकर यांची निवड करण्यात आली आहे.
पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष ॲड झेबा शेख यांचे आदेशाने राष्ट्रीय सचिव राजेंद्र लहाने,
यांनी नियुक्त पत्र देण्यात आले आहे राष्ट्रीय उप अध्यक्ष जरयाब शेख , राज्य सचिव नजीमोद्दीन काझी , मराठवाडा सचिव जगदीश बीरसने, महीला आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्ष सौ समीना सत्तार शेख यांचे हस्ते सौ अलका ताई जेजुरकर यांचा पुष्प गुच्छ देवुन सत्कार करण्यात आला आहे.
पोलिस हक्क संघर्ष संघटना सामाजिक संघटना आहे.
पोलीस दलाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे . पोलिसांच्या अनेक समस्या आहे. महीला पोलिसांच्या अनेक समस्या आहेत पोलिसांना आपले हक्काचे घर नाही.
पदोन्नती होत नाही.१२ / १८ तास नोकरी करावी लागत आहे.अशा अनेक समस्या आहे या साठी पोलीस हक्क संघर्ष संघटना पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणार आहेत. सरकारी कर्मचारी लोकांची संघटना आहे पोलिस लोकांची संघटना नाही या साठी पोलीस हक्क संघर्ष संघटना काम करणार आहे .

जालना जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे याचा निषेध करून सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय परत घेण्यात यावा या साठी पोलीस हक्क संघर्ष संघटना ने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले आहे त्याच बरोबर येवला येथे राज्य उपअध्यक्ष काझी सलीम यांच्ये अंदोलन साठी येवला येथे तारीख जाहीर झालेवर उपस्तीत राहवेत असी माहिती पोलीस हक्क संघर्ष संघटना चे राज्य सचिव नजीमोद्दीन काझी यांनी दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!