ताज्या घडामोडी

येवला मुक्ती भूमी स्मारकातील कार्यक्रमात ॲड. सरोदे यांचे प्रतिपादन सांविधानिक मूल्यांशी छेडछाड घातक

येवला मुक्ती भूमी स्मारकातील कार्यक्रमात ॲड. सरोदे यांचे प्रतिपादन सांविधानिक मूल्यांशी छेडछाड घातक
प्रतिनिधी

नाशिक : भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेतील धर्मनिरपेक्ष व समाजवादी शब्दांना असांविधानिक पद्धतीने उदेशपत्रिकेतून काढून टाकणे हा देशद्रोह आहे. संविधानात नव्याने येणारा प्रत्येक शब्द, कायदे, योजना या संसदेच्या दोन्ही सभागृहांत विचारविनिमय चर्चा संवाद करूनच बहुमताने काढता अथवा नव्याने समाविष्ट करण्यात येतात. त्यासाठी सांविधानिक नीतिनियम कायदे अस्तित्वात असून नव्या संसद भवनात भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेशी छेडछाड होत आहे. देशाला धर्मांध करून सांविधानिक हक्क, अधिकार मागणाऱ्या नागरिकांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ज्ञ व संविधान अभ्यासक अॅड. असीम सरोदे यांनी केले.

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकात आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात अॅड. सरोदे यांनी मार्गदर्शन केले. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, एकता एकात्मता, मानवता, विवेकवादी विचार हे भारतभूमीची खरी संपत्ती आहे. हे तत्त्व, विचारच कायदे स्वरूपात भारतीय संविधानात लिहिले आहेत.

येवला येथील मुक्ती भूमी स्मारकात आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अँड. असीम सरोदे. समवेत प्रकाश वाघ, प्रतिभा तायडे, शरद शेजवळ आदी.

त्याची अंमलबजावणी, काटेकोर पालन हेच देशाचे अखंडत्व कायम ठेवेल. भारतीय नागरिक सांविधानिक हक्क, अधिकार व आपल्या कर्तव्यप्रति जागरूक होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. धर्मांध लोक विवेकी विचाराला घाबरतात. कोणी कितीही हिंसक भाषा, उच्चार व्यवहार करत असले तरी आपण शांत, संयत माणसाला जोडणारी वाणी सोडता कामा नये. धर्माच्या नावावर भारत देश दुभंगू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी सार्वजनिक वाचनालय तसेच कर्डक अभ्यासिकेसही सरोदे यांनी यावेळी मानले.

ON

भेट दिली. वाचनालय तथा कर्डक अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी प्रकाश वाघ होते. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा तायडे, अॅड. बाळकृष्ण निढाळकर, नगरसेवक संजय भालेराव, गुरू निकाळे, अमीन शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुक्तीभूमी स्मारक परिसरात सरोदे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले मुक्तीभूमी अभ्यासिकेचे विद्यार्थी राजरत्न वाहुळ आणि शुभांगी मढवई यांचा सरोदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. आभार सुरेश खळे यांनी

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!