ताज्या घडामोडी

उत्तम आरोग्य,ग्रंथ वाचन व सुसंवाद ही आंनदी आयुष्याची त्रिसूत्री – मंत्री छगन भुजबळ*

*उत्तम आरोग्य,ग्रंथ वाचन व सुसंवाद ही आंनदी आयुष्याची त्रिसूत्री – मंत्री छगन भुजबळ*

*नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर:-*
ज्येष्ठ नागरिक होणे हा आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा असून उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व सुसंवाद या त्रिसूत्रीचा अंगिकार केल्यास आपण आनंदी आयुष्य जगू शकतो असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभामंडप लोकर्पण प्रंसगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.यावेळी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अभिजित शेलार,येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,ॲड.बाबासाहेब देशमुख,माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, शहराध्यक्ष दिपक लोणारी, गोविंदराव खराटे, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे,सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे,मलिक मेंबर यांच्यासह श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, वयाची साठी ओलांडल्यानंतर मनुष्यास ज्येष्ठत्व येते. वयाच्या या वळणावर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आयुष्यात योग्य बदल करून घेतले पाहीजेत. उत्तम आरोग्य हिच आपली संपत्ती आहे. यासाठी नियमित फिरणे, व्यायाम करणे, योगा करणे आणि आहारात आवश्यक बदल करणे हे तितकेच महत्वाचे आहे. चांगले ग्रंथ, पुस्तके, वर्तमानपत्र वाचन करणे, वयानुरूप खेळ खेळणे, मनोरंजनात्मक छंद जोपासणे हे गरजेचे असून यातून जगण्याची नवी दिशा मिळते. श्री. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य नागरिक येथे एकत्र येतात, एकमेकांशी संवाद साधतात यातून सुख-दु:ख, एकमेकांचे विचार यांची देवाणघेवाण होते. यामुळे मन मोकळे होवून प्रफुल्लीत राहते.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून एक कुटुंब निर्माण झाले आहे. येथे जात-पात, धर्म या गोष्टींना महत्व नसून सर्व स्त्री-पुरूष ज्येष्ठ नागरिक कुटुंबातील सदस्यांप्रमाणे एकत्र येवून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यातून त्यांना जगण्याची नवी उर्जा मिळते आणि आपलेपणाच्या नात्यातील दृढता वाढते. असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोलानाथ लोणारी यांनी केले.
०००००००

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!